संगमनेर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर! 18 पैकी 10 जागेवर महिला देणार लढत

संगमनेर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर! 18 पैकी 10 जागेवर महिला देणार लढत

गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याने दिवाळीआधीच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून नुकत्याच नगरपालिका आणि नगर परिषदेचे सोडतीचे आरक्षण जाहीर झाले आहे.

शहरातील नवीन नगर रोडवरील प्रांत कार्यालयात सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पंचायत समितीचे आरक्षण काढण्यात आले. पंचायत समितीच्या सोडतीचे आरक्षण नगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हाताने चिठ्ठ्या काढून जाहीर करण्यात आले. या मध्ये १८ जागांपैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने नगरपालिके सारखेच पंचायत समितीतही ‘महिलाराज’ येणार आहे. दरम्यान या आरक्षण सोडतीकडे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले.

दुपारी १२ वाजता आरक्षण सोडत सुरुवात झाली ही सोडत एक तासात जाहीर करण्यात आली. परंतु या सोडत आरक्षणास शहरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नसल्याची बाब लक्षणीय ठरली‌. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, निवासी नायब तहसीलदार गणेश आढारी, अव्वल कारकून अर्जुन सानप, नायब तहसीलदार मार्तंड माळवे आदि उपस्थित होते. नगरपालिका शाळा क्रमांक एकचे अरहान सय्यद, सलमान शेख या विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

असे आहे आर‌क्षण
आश्वी बुद्रुक-सर्वसाधारण महिला,
आश्वी खुर्द- सर्वसाधारण महिला,
आश्वी बुद्रुक गट-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
निमोण – नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी, समनापूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी, तळेगाव दिघे- सर्वसाधारण, वडगाव पान-अनुसूचित जाती महिला, जोर्वे -सर्वसाधारण महिला, अंभोरे – सर्वसाधारण व्यक्ती, धांदरफळ बुद्रुक-सर्वसाधारण महिला, राजापूर- सर्वसाधारण महिला, घुलेवाडी-अनुसूचित जाती (एससी) व्यक्ती, गुंजाळवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चंदनापुरी- सर्वसाधारण व्यक्ती, संगमनेर खुर्द-सर्वसाधारण महिला, साकुर-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पिंपळगाव देपा-सर्वसाधारण व्यक्ती, बोटा-अनुसूचित जाती (एसटी) महिला, आणि खंदळमाळवाडी-अनुसूचित जमाती (एसटी) व्यक्ती असे आरक्षण निघाले आहे.
समनापूर गट-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
साकुर गट-सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती
चंदनापुरी गट-सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती
तळेगाव दिघे गट- सर्वसाधारण महिला,
जोर्वे गट-नागरिकांचा मागासप्रवर्ग व्यक्ती,
धांदरफळ बुद्रुक गट- सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती,
घुलेवाडी गट-सर्वसाधारण प्रवर्ग व्यक्ती,
बोटा गट-अनुसूचित जमाती (एसटी) महिला असे आरक्षण निघाले असून चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांची शिफारस केली आहे. तसे शिफारस पत्र सरन्यायधीशांनी कायदा मंत्रालयाकडे...
ढगाळ हवामानासह पावसाचा आंबा मोहोरावर परिणाम,  पालवी कुजण्याची शक्यता 
हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट खेळाडू रोहिणी कलम घरात मृतावस्थेत आढळली, क्रीडा विश्वात खळबळ
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी वडिलांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला, तीन दिवस सुरू होते अघोरी प्रकार
चेहरा सुंदर दिसण्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
चेहरा सुंदर दिसण्यासाठी नानाविध उपाय करुन थकलात, आता वापरा या डाळीचे पीठ, रिझल्ट पाहून थक्क व्हाल
मराठी भाषा भवन रखडलंय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत नाही; पण भाजप मुख्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली! – संजय राऊत