नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई चरणी 57 लाखांचे दान

नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई चरणी 57 लाखांचे दान

यंदा नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून तब्बल 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले, तर देणगी, अभिषेक व अन्य सेवांच्या माध्यमातून तब्बल 57 लाख 19 हजार 442 रुपयांची देणगी देवस्थानकडे जमा झाली. यात सर्वाधिक 18 लाख 44 हजार 855 रुपये थेट देणगी स्वरूपात प्राप्त झाल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. नाईकवाडे म्हणाले, ‘यंदा शारदीय नवरात्रोत्सव 11 दिवस होता. या काळात श्री अंबाबाईच्या दर्शनाला देश-विदेशांतून 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले. दररोज दीड ते दोन लाखांच्या घरात भक्तांची गर्दी होत होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिवाळीची धूम; दीपोत्सव, आतषबाजी, खमंग फराळ, पुणे शहरात धन्वंतरी पूजनाने धनत्रयोदशी साजरी दिवाळीची धूम; दीपोत्सव, आतषबाजी, खमंग फराळ, पुणे शहरात धन्वंतरी पूजनाने धनत्रयोदशी साजरी
‘दिन दिन दिवाळी… गायी म्हशी ओवाळी… ‘असं म्हणत दिवाळी सणाला धूम धडक्यात सर्वत्र सुरुवात झाली. वसुबारसला गोवत्स धेनुपूजन झाल्यानंतर शनिवारी...
देश विदेश – युक्रेनला ‘टोमहॉक’ क्रूज मिसाइल नाही
नांदेडकरांना दिवाळी पहाटची मेजवानी, प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल प्रमुख आकर्षण
पाणीटंचाईविरोधात शिवसेनेसह महाविकास आघाडी रस्त्यावर, ऐन दिवाळीत पनवेलकरांची घागर उताणी
यू टर्न घेणे जीवावर बेतले, भरधाव ट्रकने तिघांना चिरडले; एकाचा मृत्यू
इन्स्टाग्रामने लहान मुलांची सिक्युरिटी वाढवली, आता 18 प्लस कंटेन्ट मुलांना दिसणार नाही!
अमेरिकेमुळे हिंदुस्थानवर व्यापारी संकट, ‘टॅरिफ’चे परिणाम दिसू लागले, चार महिन्यांत निर्यातीत जबरदस्त घसरण