मिरजोळ्यात नेपाळी महिला चालवत होती वेश्याव्यवसाय, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा छापा
रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकून कारवाई केली. या ठिकाणी एक नेपाळी नागरिक महिला पुण्यातील दोन महिलांना रत्नागिरीत आणून वेश्याव्यवसाय करत असल्याचे उघड झाले आहे.
मिरजोळे एमआयडीसी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खबर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिसांनी एक डमी ग्राहक बनवून पाठवला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. एक नेपाळी महिला पुणे येथील दोन महिलांना आणून वेश्याव्यवसाय करत असल्याचे उघड झाले. पुण्यातील दोन महिलांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्तता केली. वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर,उपनिरीक्षक संदीप ओगले,हवालदार विजय आंबेकर,दीपराज पाटील,विवेक रसाळ,भैरवनथ सवाईराम,स्वाती राणे,शीतल कांबळे,पाटील,दत्ता कांबळे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List