हैदराबादला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे विशाखापट्टणममध्ये इमर्जन्सी लँडिंग
विशाखापट्टणमहून हैदराबादला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात उड्डाणानंतर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे विमानाचे विशाखापट्टणम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानात एकूण 103 प्रवासी होते. एअरलाईन्सकडून प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. विमान केवळ 10 नॉटिकल मैल अंतरावर असताना पक्ष्याची धडक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. या घटनेनंतर विमानतळ प्रशासन आणि तांत्रिक पथकाने विमानाची तपासणी सुरू केली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान क्रमांक IX 2658 ने गुरुवारी दुपारी 2.38 वाजता विशाखापट्टणमहून नियोजित वेळेत उड्डाण केले. मात्र काही वेळात विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलटने इमर्जन्सी लँडिंगची विनंती केली. यानंतर दुपारी 3 वाजता विमानाचे विशाखापट्टणममध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे विशाखापट्टणम विमानतळ संचालक एस राजा रेड्डी यांनी सांगितले. तसेच एअरलाइनकडून पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List