बांगलादेशीला जामीन दिल्यास घुसखोरांना प्रोत्साहन मिळेल, हायकोर्टाने फेटाळला जामीन
बेकायदापणे हिंदुस्थानात वास्तव्य करणाऱया बांगलादेशीला जामीन मंजूर केल्यास घुसखोरांना प्रोत्साहन मिळेल, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका बांगलादेशीला जामीन नाकारला.
मोनीरुल इस्लाम असे या आरोपीचे नाव आहे. एटीएसने 26 डिसेंबर 2023 रोजी इस्लाम व त्याच्या पत्नीला अटक केली. दोन लहान मुले असल्याने पत्नीला जामीन मंजूर झाला, मात्र इस्लाम कोठडीतच आहे. त्याने जामिनासाठी याचिका केली होती. न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. इस्लाम अवैधपणे वास्तव्य करत होता. त्याचा गुन्हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत जामीन फेटाळण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List