ज्वेलरी उद्योगाला फटका… दीड लाख नोकऱ्या संकटात
अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे हिंदुस्थानातील जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाला मोठा फटका बसला आहे. हिरे आणि दागिन्यांची निर्यात घटल्याने सूरत, जयपूर आणि मुंबई अशा शहरांतील व्यापारावर परिणाम झाला आहे. या क्षेत्रातील सुमारे दीड लाख नोकऱया संकटात आहेत. टॅरिफमुळे अमेरिकेच्या निर्यातीत 70 टक्क्यांची घसरण होऊ शकते, अशी भीती जेम्स अँड ज्वेलरीशी संबंधित संघटनांनी व्यक्त केली आहे. हिंदुस्थान हिरे निर्यातीचा एक-तृतीयांश भाग आणि रत्नजडित आभूषणांचा निम्मा हिस्सा अमेरिकेला पाठवतो. टॅरिफ वाढल्याने त्याचा थेट परिणाम निर्यातीवर होईल, असा अंदाज आहे. गुजरातच्या सौराष्ट्र क्षेत्रात आतापर्यंत एक लाख लोकांनी नोकऱया गमावल्या आहेत. यामध्ये भावनगर, अमरेली, जुनागढच्या छोटय़ा कारखान्यात काम करणारे कामगार आहेत. निर्यातीच्या ऑर्डर कमी झाल्याने छोटय़ा कंपन्या कामगार कपात करत आहेत. हिंदुस्थान सर्वात मोठा हिरे निर्यातदार देश आहे. जगातील 90 टक्के हिऱयांवर हिंदुस्थानात काम चालते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हिंदुस्थानने अमेरिकेला 10 अब्ज डॉलरचे रत्न, आभूषणे निर्यात केली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List