जिममध्ये महिलांना पुरुषांकडून ट्रेनिंग… हायकोर्टाकडून चिंता
जिममध्ये महिलांना ट्रेनिंग देणाऱ्या पुरुष ट्रेनर्सच्या कामाच्या पद्धतीबद्दल प्रयागराज हायकोर्टाने चिंता व्यक्त केली. पुरुष ट्रेनर सुरक्षेच्या उपाययोजना न करता महिलांना ट्रेनिंग देत असल्याचे निरीक्षण कोर्टाने मांडले. जिममधील महिलांच्या सन्मानाचा मुद्द्याचाही कोर्टाने उपस्थित केला.
प्रयोगराज हायकोर्टात जिम ट्रेनर विरोधातील तक्रारीवर सुनावणी झाली. ट्रेनरविरोधात पीडित महिलेच्या मैत्रिणीचा अश्लील व्हीडिओ बनवण्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती शेखर यादव यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. गेल्यावर्षी जिम ट्रेनर नितीन सैनी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. महिलेला जातीवाचक शब्द बोलून अपमानित करणे, धक्का देऊन व्यायाम करताना जिमच्या बाहेर काढणे असे आरोप सैनी याच्यावर लावण्यात आले होते. पीडित महिलेचा आरोप होता की सैनीने तिच्या मैत्रिणीचा अश्लील व्हीडिओ बनवला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 सप्टेंबर रोजी होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List