दादर येथील चुरी कुटुंबीयांनी जपली परंपरा; गौराईला मटण, कोळंबी, सुरमईचा नैवेद्य

दादर येथील चुरी कुटुंबीयांनी जपली परंपरा; गौराईला मटण, कोळंबी, सुरमईचा नैवेद्य

‘गौराई माझी लाडाची…लाडाची ग…’ गौरीपूजन म्हणजे माहेरी आलेल्या मुलीचं केलेले गोडकौतुक असते. याच गोडकौतुकाचा एक भाग म्हणून गौराईला शाकाहारासोबत मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची शेकडो वर्षांची परंपरा मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टीच्या भागात आहे. मुंबईत आजही अनेक कुटुंबांमध्ये गौराईला मटणापासून कोळंबीचा नैवेद्य दाखवला जात आहे.

मुंबईसह विरार, पालघर, डहाणू, वाडा आणि आसपासच्या भागात गौराईला पारंपरिक नैवेद्यासोबत मांसाहारी जेवणाचा दाखवला जातो. या भागात गेल्या पन्नास शंभर वर्षांपासून तेरडय़ाच्या झाडांची, पानाफुलांची गौरी पुजली जाते. त्यावर विडय़ाच्या पानावर देवीचा अत्यंत सुंदर मुखवटा तयार केला जातो. शिवाजी पार्कच्या चुरी कुटुंबीयांनी गेल्या 65 वर्षांपासून ही परंपरा जोपासली आहे. तेरडय़ाच्या रोपांपासून तयार केलेल्या गौराईचे पूजन झाल्यावर सोमवारी गौराईला झणझणीत मांसाहारी नैवेद्य दाखवण्यात आला.

गौराईची पावले घरात उमटवतात

चुरी कुटुंबीयातील गौराईची परंपरा सध्या जान्हवी, जयश्री आणि अश्विनी चालवत आहेत. गौराई घरात आल्यावर हळद आणि तांदळाचे गौराईच्या पायांचे ठसे घरात उमटवले जातात. मग पारंपरिक दागिन्यांच्या साज केला जातो. दोन-तीन दिवस गौराईची सरबराई होते. गणपतीसोबत गौराईला निरोप देताना भाकरी तांदळाचे पीठ, गूळ, तूप, केळं, दूध यांची उकड काढळली जाते. हा सर्व शिधा निरोप देताना सोबत दिला जातो.

आळूगाठी कोळंबी, मटण, घोळीच्या माशाचं कालवण त्यात भेंडी, सुरमई फ्राय, उकडीचे मोदक, मटर पनीर, बटाटय़ाची भाजी, पुरी, आळूची भाजी, वरण भात आणि त्यावर साजूक तुपाची धार असा नैवेद्य गौराईला दाखवतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता  गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास...
सांगलीतील 10 हजारांवर शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात; कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ
425 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची दिल्ली, पुण्यात छापेमारी
विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा
पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान