खोपोलीतील मतचोरीचाही पर्दाफाश; एका प्रभागात 140 दुबार मतदार; शिळफाटा यादीत झोलमाल ‘आप’ने केला भंडाफोड

खोपोलीतील मतचोरीचाही पर्दाफाश; एका प्रभागात 140 दुबार मतदार; शिळफाटा यादीत झोलमाल ‘आप’ने केला भंडाफोड

पनवेल विधानसभा मतदारसंघात तब्बल ८५ हजार २११ दुबार दारा शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी केल्यानंतर आता खोपोलीतील मतचोरीचाही भंडाफोड झाला आहे. खोपोलीतील शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक १० या एका छोट्याशा प्रभागात तब्बल १४० दुबार मतदार असल्याची धक्कादायक बाब आम आदमी पार्टीने उघडकीस आणली आहे. आपने त्या १४० दुबार मतदारांची मतदार यादीच प्रसारमाध्यमांसमोर आणली. इतकेच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांत मृत झालेल्या आणि कायमचे स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावेही यादीतून का वगळण्यात आली नाहीत, असा सवालही केला आहे.

मतदार असल्याचे समोर आणत त्यातील ११ हजार ६०० जणांनी दोनदा मतदान करून लोकशाहीला हरताळ फासल्याचा संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आज खोपोलीतील आम आदमीचे प्रदेश संघटन सचिव डॉ. रियाज पठाण यांनी खोपोलीतील मतचोरीची खोपोलीच्या मतदार यादीतील या गंभीर बाबीबाबत खालापूरचे तहसीलदार आणि निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. या चुकांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मतदार यादीचे पुनपर्रिक्षण करून त्यात आवश्यक दुरुस्ती व्हायलाच हवी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्रातील खोपोली शहरात असलेल्या शिळफाटा येथील प्रभाग क्रमांक १० या एका प्रभागात तब्बल १४० दुबार मतदार असल्याचे पठाण यांनी पुरावेच सादर केले. या दुहेरी नॉर्दीव्यतिरिक्त कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार, अनेक वर्षांपूर्वी निधन झालेले नागरिक यांची नावेही मतदार याद्यांतून वगळण्यात आली नसल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या एका प्रभागात १४० दुबार मतदार असतील तर संपूर्ण विधानसभा मतदारसंघात किमान सात ते आठ हजार दुबार मतदार असणारच या दुबार मतदारांमुळे कुणाचा फायदा झाला, अशी शंकाही व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;