मुंबई गोवा महामार्गाची झाली चाळण, व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरेंनी NHAI ला फटकारले

मुंबई गोवा महामार्गाची झाली चाळण, व्हिडीओ शेअर करत आदित्य ठाकरेंनी NHAI ला फटकारले

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील 14 वर्षांपासून रखडलं आहे. दरवर्षी गणपती जवळं आले की, महामार्गाच काम पूर्ण होईल, अशी पोकळं अश्वासन दिली जातात. परंतु प्रत्यक्षात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना कंबरड मोडूनच प्रवास करावा लागतो. यावर्षीही परिस्थिती जैसे थे आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश; चाळण झाली आहे. याचा व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शेअर करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) फटकारलं आहे.

मुंबई-गोवा महामर्गावर खड्ड्यांच साम्राज्य निर्माण झालं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई गोवा महार्गाचं विदारक दृश्य दिसत आहे. हा व्हिडीओ एका ट्वीटर वापरकर्त्याने शेअर केला असून हिंदुस्थानातल्या सर्वात श्रीमंत राज्यातील महामार्गाची ही अवस्था असल्याचं त्याने म्हटलं आहे. हाच व्हिडीओ आदित्य ठाकरे यांनी रिपोस्ट केला असून महाराष्ट्रातील अनेक महामार्गांची हीच अवस्था असल्याचं म्हणत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जनसंपर्क बोगस असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 2011 मध्ये सुरू झाले. मात्र 14 वर्षे पूर्ण होऊनही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. सध्या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे ठिकठिकाणी खडी रस्त्यावर पसरली आहे. काही खड्डे तर एक फूट खोलीचे आहेत. या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अतिशय धोकादायक झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केगाव प्रशिक्षण केंद्रातील 170 पोलिसांना विषबाधा केगाव प्रशिक्षण केंद्रातील 170 पोलिसांना विषबाधा
सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणाऱया सुमारे 170 पोलिसांना मंगळवारी (दि. 2) रात्री विषबाधा झाल्याने उपचारासाठी...
हिंदुस्थानची तटबंदी आणखी मजबूत होणार, रशिया-हिंदुस्थानच्या एस-400 प्रणाली डीलकडे अमेरिकेची करडी नजर
मुलाला दोन्ही पालकांच्या प्रेमाचा कायदेशीर हक्क, वडिलांना व्हिडीओ कॉलवर बोलण्याची सुप्रीम कोर्टाकडून परवानगी
450 कोटींच्या घोटाळ्यातील फिर्यादीच निघाला आरोपी
झोमॅटोचा ग्राहकांना झटका… जेवण ऑर्डर करणे महागले! प्रत्येक ऑर्डरसाठी आता 12 रुपये शुल्क मोजावे लागणार
Nagpur news – सोलार कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू; 10 कामगार जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
‘ग्लोबल अय्यप्पा संगमम’ला आव्हान