Buchi Babu Trophy 2025 – पृथ्वीचे महाराष्ट्राकडून दमदार पदार्पण! पहिल्याच लढतीत झळकावले खणखणीत शतक
मुंबई सोडून महाराष्ट्राच्या संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ याने दमदार पदार्पण केले आहे. बुची बाबू स्पर्धेत पहिल्याच लढतीत पृथ्वी शॉ याने छत्तीसगड विरुद्ध खेळताना खणखणीत शतक झळकावले आहे. पृथ्वीने 122 चेंडूत 14 चौकार आणि एक उत्तुंग षटकार ठोकत शतकाला गवसणी घातली.
PRITHVI SHAW SCORED 111(140) WHEN THE TEAM SCORE IS 166/6
– A Dream Debut for Maharashtra in Buchi Babu Trophy. pic.twitter.com/gw9KPhdEi3
— Johns. (@CricCrazyJohns) August 19, 2025
पृथ्वी शॉ याच्यासाठी गेले काही वर्ष खास राहिलेले नाही. टीम इंडियामधून दत्तू मिळाल्यानंतर मुंबईच्या संघातही त्याला स्थान मिळाले नाही. एवढेच नाही तर आयपीएलमध्येही त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. यामुळे नैराश्य आलेल्या पृथ्वीने बदल म्हणून मुंबई सोडली आणि महाराष्ट्राच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या पथ्यावर पडला आणि महाराष्ट्राकडून पहिल्यांदाच खेळताना शतक ठोकले.
चेन्नई येथे बुची बाबू स्पर्धेत छत्तीसगड विरुद्ध महाराष्ट्राचा डाव संकटात असताना पृथ्वीने आपला अनुभव पणाला लावत शतक ठोकले. त्याने 140 चेंडूत 111 धावांची खेळी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List