शाळाबाह्य, स्थलांतरित बालकांची 15 जुलैपर्यंत होणार शोधमोहीम

शाळाबाह्य, स्थलांतरित बालकांची 15 जुलैपर्यंत होणार शोधमोहीम

जिल्ह्यातील तीन ते अठरा वयोगटांतील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी 15 जुलैपर्यंत विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून मोहिमेबाबत सूचना केल्या आहेत. तसेच यासाठी प्रत्येक तालुक्यातून एक नोडल अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यात दक्षिणेतील अनेक तालुक्यांतून ऊसतोडणी कामगार, वीटभट्टी कामगारांची संख्या अधिक असून, दरवर्षी शाळाबाह्य आणि स्थलांतरित बालकांची संख्या मोठी असल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी शोधमोहीम राबविण्यात येते. कोविडनंतर राज्यात रोजगाराची अनिश्चितता, सामाजिक असुरक्षितता, पालकांच्या मनातील भीती यामुळे बालमजुरी आणि बालविवाहाचे प्रमाण वाढत असून, ते रोखण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

आरटीई (शिक्षण हक्क कायदा) नुसार बालकांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बालकांचे पालकांसोबत होणारे स्थलांतर थांबविणे, त्यांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

सर्वेक्षणाची ठिकाणे 

सर्व खेडी, वाड्या-वस्त्या, ताडे, पाडे, शेतमळे व जंगले, बसस्थानक, रेल्वे स्थानक, सिग्नल्स, हॉटेल्स-खाणावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारतळ, वीटभट्टय़ा, दगडखाणी, साखर कारखाने, वंचित गटातील वस्त्या, स्थलांतरित कुटुंबे, महिला व बालविकास विभाग अंतर्गत बालगृहे, विशेष दत्तक संस्था, निरीक्षणगृहे आदी, शिक्षणहमी कार्ड देणे ही सर्वेक्षणाची उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात शालेय शिक्षण विभागाबरोबरच महसूल विभागाचाही सहभाग अपेक्षित असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री...
आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचा कला केंद्रात गोळीबार, दौंडनजीक धक्कादायक घटना; 36 तासांनंतर चार जणांविरुद्ध गुन्हा
रंगभूमीवरील ‘रत्न’ हरपले, सर्जनशील नाटककार रतन थिय्याम कालवश
गुजरातमध्ये चार दहशतवाद्यांना अटक, हल्ल्याचा कट उधळला…, अल कायदा कनेक्शन उघड
मतदार यादी फेरपडताळणीवरून सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ, अध्यक्षांसमोर फलक झळकावले; कामकाज दिवसभरासाठी ठप्प
रमीत अडकलेले ‘माणिक’ मंत्रिमंडळातच; कोकाटेंची हकालपट्टी नव्हे, फक्त थुकपट्टी; केवळ कृषिमंत्री पदावरून हटवणार, नवे खाते देणार
हनी ट्रप बनला मनी ट्रप! लोढाने व्हिडिओ दाखवून मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून वसूल केले तब्बल 200 कोटी, काँग्रेसचा आरोप