Kitchen Tips – स्वयंपाकघरातील भांड्यांनाही असते एक्सपायरी डेट, वाचा
अन्नपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर, आपण त्यांची एक्सपायरी डेट तपासल्यानंतरच खरेदी करतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का आपल्या स्वयंपाकघरामधील वापरात असलेल्या भांड्यांनाही एक्सपायरी डेट असते. स्वयंपाकघरात वापरलेली जाणारी भांडी कायमस्वरूपी वापरायची नसतात. ठराविक वेळेनंतर ती बदलणे आवश्यक असते. अन्यथा, त्यांचा वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.
नॉन-स्टिक फ्राईंग पॅन
नॉन-स्टिक फ्राईंग पॅन 1 ते 2 वर्षांनी बदलावेत. जेव्हा अन्न जळू लागते आणि नॉन-स्टिक पॅनवरचे कोटींग निघत असेल तेव्हा तुम्ही ते पॅन बदलने गरजेचे असते. नाहीतर अन्नात ते कोटींग येऊन त्याचा परिणाम शरीरावर होऊ शकतो.
प्लॅस्टिक कटिंग बोर्ड
घरामध्ये भाज्या कापण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक कटिंग बोर्ड तुम्ही ते 1 ते 2 वर्षात बदलले पाहिजेत. अनेकदा बोर्डवरचे प्लॅस्टीक सोलायला सुरुवात होते त्यावेळी ते प्लॅस्टीक भाज्यांमध्ये येऊन पोटात जाऊन आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
प्लॅस्टिक चमचा
अनेक घरांमध्ये भाजी ढवळण्यासाठी वापरला जाणारा सिलिकॉन स्पॅटुला जर क्रॅक झाला असेल, कडा वितळला किंवा मऊ झाला तर तो लगेच बदलावा. कारण प्लॅस्टीकचा चमचा वापरण्याचा काळ 2 ते 3 वर्षेच असतो, त्यानंतर ते स्वयंपाकघरात वापरू नये.
भांडी धुण्याचा स्पंच किंवा स्क्रब
आपण भांडी धुण्यासाठी स्पंज आणि स्क्रबर वापरतो, ते 2 ते 4 आठवड्यांनी बदलले पाहिजेत. जर त्यातून दुर्गंध येत असेल तर ते लवकर बदलले पाहिजे.
सोलाण
गाजर आणि काकडी यासारख्या भाज्या सोलण्यासाठी वापरला जाणारे सोलाणं दर 1 ते 2 वर्षांनी बदलावा. वापरानुसार त्याची तीक्ष्ण धार निस्तेज होते आणि हँडल देखील जीर्ण होते.
चाकू
स्वयंपाकघरात चाकूचा वापर सर्वाधिक केला जातो आणि म्हणूनच ते 3 ते 4 वर्षांच्या आत बदलले पाहिजेत. नाहितर चाकूला गंज चढू शकतो आणि त्याने भाज्या किंवा फळे कापल्याने चाकूचा गंज पदार्थाला लागून पोटात जाऊ शकतो.
खवणी
2 ते 3 वर्षांच्या आत खवणी बदलली पाहिजे कारण खवणीवर धुळ लागते आणि त्याची तीक्ष्णता देखील वापरानुसार कमी होते. त्यामुळे खवणी लवकरात लवकर बदलली पाहिजे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List