शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले
नाशिकरोड येथील दुर्गा गार्डन भागात एका कार्यक्रमासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आले होते. हे कळताच संतप्त शिवसैनिक तेथे पोहोचले. कृषीमंत्री कोकाटे यांचा धिक्कार असो, माणिकराव कोकाटे राजीनामा द्या, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी कोकाटे यांच्या अंगावर पत्ते फेकले.
या आंदोलनाने पोलीस व अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली. शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले असतानाही मंत्री मतदारसंघात फिरकले नाही, ते रमी खेळण्यात रमले असल्याने त्यांना पत्ते दिले, असे या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अस्लम (भैया) मणियार यांनी सांगितले. त्यांच्यासह योगेश देशमुख, नीलेश शिरसाट यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List