Latur News – तिर्रट जुगार खेळणाऱ्या 37 जणांवर गुन्हा दाखल, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूरमध्ये तिर्रट जुगाराच्या अड्ड्यावर छापेमारी करत पोलिसांनी 37 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाणे देवणीचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, पोलीस ठाणे उदगीर शहरचे पोलीस निरीक्षक गाडे, उदगीर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्या नेतृत्वातील संयुक्त पथकाने उदगीर तालुक्यातील देवणी पोलीस ठाणे हद्दीतील मोघा शिवारात ही कारवाई करण्यात आली. छापेमारीत पोलिसांनी 5,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
देवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उदगीर-बिदर रोडवरील मोघा येथे रविवारी रात्री 22.40 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यादरम्यान 37 आरोपी तिर्रट नावाचा जुगार पैसे लावून खेळत व खेळवत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये रोख रक्कम 2,45,000 रुपये तसेच 2,74,500 किंमतीचे मोबाईल रुपये असा अंदाजे 5,19,500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर क्लबचे मालक शिवाजी अण्णाराव नेमताबादे (पाटील) यांच्याविरुद्ध देवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे करीत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List