चंद्रपुरात रेस्टॉरंट अॅन्ड बार असोसिएशनचे आंदोलन; सरकारच्या करवाढीचा केला निषेध
महाराष्ट्र सरकारने रेस्टॉरंट, हॉटेल आणि परमीट रूमच्या अबकारी शुल्कात वाढ केली आहे. त्याच्या निषेधार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील रेस्टारंट अॅन्ड बार असोसिएशनद्वारे जिल्ह्यात एकदिवसीय बार बंद आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सरकारने परमिट रुमवर 10 टक्के व्हॅट लावण्यात आला आहे. मात्र, यावर्षी 15 टक्के फी वाढ करून अबकारी शुल्कात दीड पट वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे हा व्यवसाय करणाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण जिल्ह्यातील बारमधील विक्री 50 टक्केपेक्षा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 650 बार ॲन्ड रेस्टॉरंटमधील विक्री कमी झाल्यास जवळपास 25 टक्केपेक्षा जास्त बार बंद पडण्याची शक्यता आहे. बार बंद झाल्यास तेथे काम करणाऱ्या हजारो लोकांचा रोजगार बुडू शकतो. त्यामुळे शासनाने टॅक्स वाढ तत्काळ थांबवावी, यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List