नाटे येथील व्यापारी संकुलाला भीषण आग; सात दुकाने जळून खाक

नाटे येथील व्यापारी संकुलाला भीषण आग; सात दुकाने जळून खाक

राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सात दुकाने जळून खाक झाली आहेत. व्यापाऱ्यांचे सुमारे 60 लाख रूपयांहून अधिक नुकसान झाले आहे. नाटे येथील राजेश दत्ताराम पावसकर यांच्या मालकीच्या इमारतीला काल रात्री काल रात्री 12.30 वाजता अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी आटोकाट प्रयत्न केले. त्यानंतर, राजापूर नगर पालिकेचा अग्नीशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. सुमारे पाच तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. मात्र, तोपर्यंत सात दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. या इमारतीमध्ये कोणीही रहिवासी नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये व्यवसायिकांचे सुमारे साठ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दिगंबर गिजम यांच्या उपहारगृहातील संपूर्ण फर्निचर, किचन यंत्रणा आणि साहित्य जळून नुकसान झाले आहे. तर, भीम खंडी यांचे चायनीज फास्ट फूड सेंटर जळून, प्रदीप मयेकर यांच्या टेलरिंग शॉपमधील मशीन्स, तयार कपडे, केदार ठाकूर यांचे कापड व प्लास्टिक वस्तू विक्री दुकान, प्रसाद पाखरे यांच्या फोटो स्टुडिओ आगीच्या भक्षस्थानी पडून कॅमेरे, प्रिंटिंग उपकरणे, संगणक, निकिता गोसावी यांचे ब्युटी पार्लर, नारायण गोसावी यांचे कटलरी साहित्यांचे गोडाऊन जळून खाक झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता शरीरात दिसणारी ही चिन्हे मधुमेहाची सुरुवाती लक्षणे असू शकतात; तुम्ही टेस्ट न करताही ओळखू शकता
आजकाल फार कमी वयात मुला-मुलींना डायबिटीस होताना दिसत आहे. रोजची लाईफस्टाईल पाहता डायबिटीस होणं म्हणजे अगदी सामान्य बाब झाली आहे....
Ratnagiri News – रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्राप्त; हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
राज्याचं महसूल वाढवण्यासाठी नवीन दारू परवाने देणं योग्य नाही, या धोरणामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं – अंबादास दानवे
Photo – काळ्या सुटमध्ये रुबाबदार सौंदर्य, वैदेही परशुरामीचा बॉसी लूक
चंद्रपुरात रेस्टॉरंट अ‍ॅन्ड बार असोसिएशनचे आंदोलन; सरकारच्या करवाढीचा केला निषेध
रशियाचे Mi-8 हेलिकॉप्टर बेपत्ता, उड्डाणानंतर काही वेळातच संपर्क तुटला
Nanded News – भाजप आमदाराची सहकार विभागाच्या उपनिबंधकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल