राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याला साडेसातीचा फेरा

राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याला साडेसातीचा फेरा

>> नवनाथ कुसळकर

तीर्थक्षेत्र शिर्डीनंतर तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर या प्रमुख धार्मिकस्थळी अलीकडच्या काळात लाखो भाविकांची गर्दी वाढत आहे. वाढती गर्दी लक्षात घेता, मागील पाच वर्षांपूर्वी राहुरी-शनिशिंगणापूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून तयार करण्यात आला. या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने 111 रुपये कोटी खर्च केले. तरीही हा रस्ता आजही अपूर्ण अवस्थेत आहे. आता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 18 महिन्यांच्या पर्वकाळ आहे. यावेळी लाखो भाविक शनिशिंगणापुरात हजेरी लावतील. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सिंगल लेन मार्गाची मर्यादा वाढवून चारपदरी रस्त्याला मंजुरी देण्यात आली. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या 325 कोटी रुपये काँक्रिटीकरण रस्त्याची मंजुरी केंद्रीय रस्ते मंत्रालयाकडे आहे. यासाठी बांधकाम खात्याने प्रस्ताव तयार केल्याने राहुरी-शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्ग आता चारपदरी होणार आहे. दरम्यान, रस्त्यात जाणाऱ्या जमिनीचे भूसंपादन मोबदल्यासाठी न्यायालयात दाखल विविध याचिकेमुळे राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याला लागलेला साडेसातीचा फेरा सुटणार का, हा प्रश्न आहे.

नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या राहुरी-शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 याचे 26 किलोमीटर अंतर आहे. रस्त्याच्या बाजूचे भूसंपादन करण्यासाठी मध्यापासून दोन्ही बाजूचे 50-50 फूट जवळपास 100 फूट अंतराचे रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे. अहिल्यानगर शिर्डी महामार्ग राहुरीपासून थेट नगर-छत्रपती संभाजीनगर या दोन महामार्गांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यासाठी 325 कोटी रुपये खर्चाचा अपेक्षित आराखडा राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता, अहिल्यानगर यांनी तयार केला. रस्त्यालगत असणारी शेतजमीन व कच्ची पक्की बांधकामे हटवली जाणार असून, भूसंपादनासाठी 45 कोटी रुपयांचा या आराखडय़ात समावेश आहे. चार पदरी होणाऱ्या महामार्गाच्या मध्ये दोन फुटाचे डिव्हायडर असून, अत्यंत मजबूत असा चारपदरी रस्ता कमी वेळेत लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याने दिली.

रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, अहिल्यानगर, राहुरी-शनिशिंगणापूर व अन्य रस्त्यांचा या कामांमध्ये समावेश केला असून, सद्यस्थितीला राहुरी-शनिशिंगणापूर हा महामार्ग अरुंद आहे. या मार्गावरील मोठमोठी अतिक्रमणे काढावी लागणार असल्याने बांधकाम खात्याच्या नाकात दम येणार असल्याचे चित्र आहे.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळा बारा वर्षांनंतर ऑक्टोबर 2026 ते 2028 या कालावधीत आहे. तब्बल 18 महिने कुंभ पर्वकाळात शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर व तीर्थक्षेत्र शनिमहाराजांचे शनिशिंगणापूर या जिह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांवर भाविकांची लक्षवेधी गर्दी दिसणार आहे. त्याचबरोबर शनिशिंगणापूरजवळ असलेले श्री ज्ञानेश्वर मंदिर नेवासा, दत्त देवस्थान देवगड, पाथर्डी येथील मोहटा देवी, श्रीक्षेत्र मढी कानिफनाथ, या प्रमुख देवस्थानांवरील गर्दीत भर पडणार आहे. त्यामुळे प्रमुख मार्ग असणारे रस्ते रुंद केले जाणार असून, त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे.

अहिल्यानगर-मनमाड हायवे ते अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोडणाऱया चार पदरी रस्त्यास नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. शासकीय पातळीवर रस्त्याच्या कामासाठी हालचाली वाढल्या असताना, न्यायालयात प्रलंबित याचिका यासह अनेक प्रश्न निर्माण झाल्याने हा रस्ता साडेसातीच्या फेऱ्यात अडकला आहे.

छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका प्रलंबित

शनिमंदिरापासून संभाजीनगर हायवेपर्यंत पावणेतीन किलोमीटर रस्त्याचा भूसंपादन मोबदला मिळावा, यासाठी त्या भागातील शेतकऱयांनी संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेला तब्बल पाच वर्षे उलटून गेले तरी पावणेतीन किलोमीटर अंतराचा निर्णय होऊ शकला नाही. 26 किलोमीटरच्या अंतरात पावणेतीन किलोमीटर न्यायालयीन लढाईत अडकले आहेत. शिवाय मध्यंतरी राहुरी, शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी अतिक्रमणे काढण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता अहिल्यानगर यांनी 5 एप्रिल 2025 रोजी रस्त्यालगत सरकारी जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. सोनई व वंजारवाडी रस्त्यालगत असलेली काही अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढून घेतली. मात्र, येथील 40 शेतकरी व अतिक्रमणधारकांनी नोटिशीला आव्हान देत संभाजीनगर खंडपीठात रीट याचिका दाखल केली केली आहे. त्यावर न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत अतिक्रमणे काढू नयेत, असे आदेश बजावले आहेत. सध्या दोन्ही याचिका प्रलंबित आहेत.

राहुरी-शनिशिंगणापूर राष्ट्रीय महामार्गास नव्याने मंजुरी मिळाली आहे. रस्ता खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून, सदर आराखडा मंजुरीसाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे. रस्त्यावरील वीज वितरण व पाणीपुरवठा विभागाकडून माहिती मागवण्याचे काम सुरू आहे.

– प्रवीण काळे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होतात, या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा मासिक पाळीदरम्यान खूप वेदना होतात, या घरगुती टिप्स नक्की ट्राय करा
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. निरोगी राहाण्यासाठी तुमच्या आहारात योग्य पदार्थांचा...
प्रोफेसर शरीरसंबंधासाठी वारंवार जबरदस्ती करत होता, विद्यार्थिनीने कॉलेज कँम्पसमध्येच उचलले टोकाचे पाऊल
IND Vs ENG 3rd Test – मोहम्मद सिराजचा घातक चेंडू आणि इंग्लंडचा कर्णधार मैदानातच झोपला, Video व्हायरल
महाराष्ट्रातील भाजप युतीचे सरकार चोरीचे, संविधान बदलू देणार नाही – इम्रान प्रतापगढी
Crime News – दमून आलेला पती मुलांच्या शेजारी झोपला, डाव साधत पत्नीने गळा चिरला
प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्यामागे भाजपच्या गुंडांचा हात, हल्लेखोरांवर कारवाई करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
वकील प्रेयसीला भेटायला बोलावलं, मग विवाहित प्रियकराने जे केलं त्यानंतर सारंच संपलं!