अमेरिकेत फिरायला गेलेल्या हिंदुस्थानी कुटुंबाचा कार अपघात दुर्दैवी मृत्यू
सुट्टीनिमित्त अमेरिकेत फिरायला गेलेल्या हैदराबाद येथील कुटुंबाचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. अमेरिकेतील डलास शहरात ही घटना घडली. भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने हा अपघात घडला.
हैदराबाद येथील तेजस्विनी, श्री वेंकट आणि त्यांची दोन निष्पाप मुले सुट्टीनिमित्त अमेरिकेत फिरायला गेले होते. अटलांटातील नातेवाईकांना भेटून डलासला परतत असताना भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यात त्यांच्या कारला आग लागली आणि चौघांचा जळून मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. हिंदुस्थानी दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयानेही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मृतदेह हिंदुस्थानात आणण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी ते अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List