Mira Road Protest: मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल! मीरा रोड मधील मराठी मोर्चा घोडबंदराला काढण्याचा दिला पर्याय

Mira Road Protest: मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल! मीरा रोड मधील मराठी मोर्चा घोडबंदराला काढण्याचा दिला पर्याय

मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्त्वात मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मात्र या मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. यामुळे मराठी जन नाराज झाले. तसेच मोर्चास परवानगी नाकारण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर मराठी जनांचा संताप उफाळून आला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्त्वात लोक रस्त्यावर उतरले. यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेचे कार्यकर्तेही सहभागी झाले.

मुख्यमंत्री नक्की मराठीच आहे की त्यांच्या अंगात मोरारजी देसाईंचा आत्मा शिरलाय? संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मीरारोड इथे मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाज दिल्यानंतर मराठी मोर्चासाठी राजकीय पक्षभेद विसरून मराठी कार्यकर्ते या मोर्चामध्ये उतरल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार राजन विचारे हे असंख्य कार्यकर्त्यांसह या मोर्चात सहभागी झाले.

यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी केलेले दावे महाराष्ट्र एकीकरण समितीने फेटाळून लावले. मोर्चाला परवानगी नाकरणाऱ्या सरकार विषयी यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, ‘पोलीस मोर्चाची परवानगी द्यायला तयार नव्हते, आणि जो मार्ग बदलण्याचा विषय आहे तर, घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि मराठी लोकांना सांगत होते, मोर्चा काढा घोडबंदर रोडवर, याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती. मीरा रोडमधल्या घटनेचा घोडबंदरमध्ये कुणी मोर्चा काढतं का?’, असा त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या हाकेला मराठी जनांनी प्रचंड प्रतिसाद देत सत्ताधाऱ्यांचे मनसूबे उधळून लावले. मराठी माणसाची शक्ती यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वांसमोर आली.

मराठी जनांमध्ये संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता, मात्र असं असताना देखील मराठी जनता रस्त्यावर उतरली. जमावबंदीचा आदेश डावलून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर छत्रपती शिवरायांच्या वेशात आंदोलनात सहभागी झालेल्या एका मुलाला पोलिसांनी धमकावलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.

Mira Road Protest: CM’s Claims Debunked as Marathi March Denied Permit

Maharashtra Ekikaran Samiti, Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray), MNS challenge CM Fadnavis’s claims after the Mira Road Marathi protest was denied permission, citing a questionable route change.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे सुडाने कारवाई, किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा अहिल्यानगर महापालिकेतील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे सुडाने कारवाई, किरण काळे यांच्यावर खोटा गुन्हा
अहिल्यानगर महापालिकेतील रस्त्यांच्या कामातील 400 कोटींचा घोटाळा उघडकीस आणून भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांचा पर्दाफाश शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांनी...
बिहार विधानसभेत राडा; विरोधक, मार्शल्समध्ये धक्काबुक्की
शिवसैनिकांनी कोकाटेंच्या अंगावर पत्ते फेकले
सुरतमध्ये 28 किलो सोन्याची पेस्ट पकडली
गटारी नव्हे, ही तर दीप अमावस्या…जाणून घ्या महत्त्व…
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 23 जुलै 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
महायुती सरकार भिकारी! माणिकरावांच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद; बळीराजा भडकला… राज्यात ठिकठिकाणी उग्र आंदोलन