सभागृहात रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना घरचा रस्ता दाखवा, अंबादास दानवे यांची मागणी

सभागृहात रमी खेळणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना घरचा रस्ता दाखवा, अंबादास दानवे यांची मागणी

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेश सुरू असताना विधानसभेच्या सभागृहात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला. हा व्हिडीओ म्हणजे राज्य सरकारची शेतकर्‍यांप्रती असलेली असंवेदनशीलता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्याना घरी बसवावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई येथे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात दानवे यांनी विविध प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारला घाम फोडला. याबद्दल माहिती देण्यासाठी क्रांतिचौक येथील दानवे यांच्या ‘मातृभूमी प्रतिष्ठान’ या संपर्क कार्यालयात अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडीओवरही प्रतिक्रिया दिली.

कोकाटे यांच्या व्हिडीओबाबत पत्रकारांनी दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, शेतकर्‍यांच्याप्रती राज्य सरकार किती असंवदेनशील आहे, हे यावरून दिसून येते. सभागृहात शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना कृषिमंत्री रमी खेळण्यात गुंग होते.

ते पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांचा पिकविमा, कर्जमाफी, बोगस बियाणे, पावसाची ओढ, खतांच्या वाढत्या किमती, शेतकर्‍यांची होत असलेली लूट या विषयावर दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मात्र कृषिमंत्री कोकाटे हे रमी खेळण्यात मग्न असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत असले तरी राज्य सरकारची मजबुरी आहे. अशा मंत्र्यांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे.

अमित शहांनी ज्या चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचेही नाव, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या कृषिमंत्र्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांना घरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतोय; शेतकऱ्यांनो यांना धडा शिकवा! वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;