Ratnagiri News – घरगुती वाद विकोपाला गेला, सख्खा भाऊच जीवावर उठला; आरोपी ताब्यात

Ratnagiri News – घरगुती वाद विकोपाला गेला, सख्खा भाऊच जीवावर उठला; आरोपी ताब्यात

घरगुती वादातून सख्खा भाऊच भावाच्या जीवावर उठला. धारदार हत्याराने वार करत भावानेच भावाची हत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दापोलीतील उन्हवरे गावात घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. विनोद गणपत तांबे असे मयताचे नाव आहे. दापोली पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. रवींद्र गणपत तांबे असे अटक आरोपीचे नाव आहे.

उन्हवरे येथील बौद्धवाडी येथे तांबे कुटुंब राहते. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र शनिवारी काही कारणातून दोघा भावांमध्ये वाद झाला. याच वादातून रवींद्रने विनोदवर धारदार हत्याराने वार केला. यात विनोदचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

पोलिसांनी संशयित आरोपी रवींद्र तांबे याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेच्या तपासासाठी चिपळूण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र राजमाने आणि दापोली पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, फॉरेन्सिक पथकाला देखील तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;