Pune News – कवठे येमाईच्या सरपंचपदी मनिषा भोर यांची बिनविरोध निवड
शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील एक मोठी लोकसंख्या असलेल्या कवठे येमाई येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनिषा पांडुरंग भोर यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच ज्योती मुंजाळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी गुरुवारी 17 जुलै रोजी या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी मनिषा भोर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. फलके यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव, ग्रामपंचायत अधिकारी चेतन वाव्हळ यांनी निवडणूक कामकाज पाहिले. सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर मनिषा भोर यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार व गावातून भंडारा, गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक संपन्न झाली. यावेळी गावचे आजी-माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List