Video – आकाशात थरार; उड्डाणानंतर विमानाचं इंजिन पेटलं, ‘डेल्टा बोईंग 767’चे लॉस एंजेलिसमध्ये इमर्जन्सी लँडिंग
अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या आहेत. 12 जूनला लंडनला निघालेले एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील 52 ब्रिटीश नागरिकांसह 241 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते, तर एक जण सुदैवाने वाचला होता. तर विमानाबाहेरील 18 ते 19 जणांचाही यात मृत्यू झाला होता. याच दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात येणाऱ्या लॉस एंजेलिस येथे अहमदाबाद-लंडन विमान अपघाताची पुनरावृत्ती टळली आहे. येथे डेल्टा एअरलाईन्सच्या अटलांटा येथे जाणाऱ्या विमानाला उड्डाणानंतर आग लागली होती. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डेल्टा एअरलाईन्सकडून चालवली जाणारी फ्लाइट 446, बोईंग 767-400 विमान लॉस एंजिलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेपावत असताना विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागते. इंजिनमधून आगीच्या ज्वाला येत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. याची माहिती मिळताच पायलटने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमानचे इमर्जन्सी लँडिंग केले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानतळावरून अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवते आणि त्यानंतर विमान अटलांटाच्या दिशेने मार्गस्थ होते.
Boeing 787 Makes Emergency Landing in LA
– Engine ON FIRE
Video claims to show a Delta Airlines flight bound for Atlanta on Friday making an emergency landing at LAX. The engine reportedly caught fire shortly after take-off.
@LAFlightsLIVE https://t.co/t1HBVLDi0P pic.twitter.com/vYNgkpZJcq
— RT_India (@RT_India_news) July 19, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List