साखरपा गुरववाडी येथे गवारेड्यांचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीती, शेतीचे नुकसान होण्याचीही शक्यता
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गुरववाडी येथे दिवसाढवळ्या गवारेडे दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच वस्तीपासून जवळच गवारेडे येत असल्याने गुरे चरण्यास जाणारे गुराखी गवारेड्याच्या भीतीने धास्तावले आहेत. त्यातच शेतीचे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे.
साखरपा गुरववाडीचा मार्ग पुढे बोंडये व मारळ गावाला जोडतो. त्यामुळे येथे नेहमी रहदारी असते. त्याचबरोबर गुरववाडीतील ग्रामस्थ यांची कामानिमित्त व खरेदीसाठी साखरपा बाजारपेठ येथे सतत वर्दळ असते. मात्र गवारेड्यांच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीती वाढली आहे. गत काही महिन्यापूर्वी याच मार्गदरम्यान बिबट्याने गुरववाडीतील एका तरुणावर हल्ला करून त्याला जखमी केला होता. तेव्हाही परिसरात भीतीचे वातावरण होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List