अमित शहांनी ज्या चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचेही नाव, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
लातूरहून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला कृषींत्र्यांना वेळ नव्हता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच अमित शहांनी ज्या चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचेही नाव आहे असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, तीन महिन्यांत 650 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परवा तर दोन शेतकरी लातूरहून मुंबईत चालत आले. त्यांना भेटायला आमच्या कृषीमंत्र्यांना वेळ नाही. गेल्या काही काळातील कृषिमंत्र्यांची विधानं पहा. कुणाचे पैश्यांच्या बॅगेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कुणी रमी खेळतंय, कुणी आमदार निवासात मारामाऱ्या करतंय. कुणी विधानवभनात मारामारी करतंय ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. ज्या कृषीमंत्र्यांचे तुम्ही नाव घेतलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहांनी ज्या चार मंत्र्याना डच्चू देण्याचे सुचवले आहे, त्यात त्यांचेही नाव आहे. अमित शहांनी चार ते पाच मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.
केंद्रातलं सरकार दुटप्पी आणि ढोंगी आहे. छत्तीसडमध्ये ऑनलाईन गेमिंग प्रकरणी माजी मुख्य़मंत्री भुपेश बघेल आणि त्यांच्या मुलाला या प्रकरणी अटक केली होती. पण अशाच प्रकारचे गुन्हे महाराष्ट्राचे राजकारणी आणि सत्ताधारी करत आहेत. ऑनलाईन गेमिंगमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, त्यांच्यावर ईडीने किंवा सीबीआयने कुठलीही कारवाई केलेली नाही. पण दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंडच्या अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांवर केली असे संजय राऊत म्हणाले.
शिंदे गटाचे मंत्री कोणत्या प्रकारच्या अडचणीत आले आहेत याची यादी काढा. एक मंत्री आमदार निवास्थानात टॉवेलवर मारामाऱ्या करतो, दुसरा मंत्री त्याच्या घरात सिगरेटचे झुरके मारत बनियनवर पैश्यांची भरलेली बॅग दाखवतोय की आम्ही कसे श्रीमंत आहोत, आम्ही कशी लुटमारी केलीये. एक मंत्र्यांच्या मालकीच्या बारमध्ये मुली नाचतात आणि पैसे उधळले जातात. आणि हे मंत्री दुसऱ्याच्या बारमध्ये धाडी घालतात. हे मंत्री वाशी, पनवेल भागात जाऊन दुसऱ्यांच्या बारवर जाऊन दहशत निर्माण करत आहेत. ती का निर्माण करत आहेत, असा दबाव आणून काय केलं जातं हे तुम्हाला माहित आहे. पण स्वतःच्या बारमध्ये काय चाललंय हे सरकारनेच उघड केलं. स्थानिक पोलीस स्टेशन आणि इतर खात्याकडून जेव्हा त्यांच्या बारवर धाड पडली, याचा अर्थ ही धाड सरकारनेच टाकली आहे ना. तुम्ही स्वतः त्या खात्याचे मंत्री आहात ना. तुम्हाला माहित नाही तुमच्या बारवर धाडी पडत आहेत. याचा अर्थ पडद्यामागे काय चाललंय हे तुम्हाला कळत असेल. कुणीतरी एक अदृश्य शक्ती शिंदेंच्या मंत्र्यांचे हे सगळे खेळ खंडोबे बाहेर करण्यासाठी काम करतंय मेहनतीने हे महाराष्ट्राला कळालेले आहे. रामदास कदम यांनी हा डान्स बार नसल्याचे म्हटले आहे, पण यात समता नगर पोलीस स्टेशनचा FIR वाचा. याचा अर्थ त्यांचेच खातं त्यांच्याच कुटुंबीयांविरोधात खोटा एफआयर केला आहे का? राजीनामा द्या तुम्ही. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो की ते कुणालाही मुलाहिजा न ठेवता ते असे काम करत आहेत असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List