डोनाल्ड ट्रम्प 100 देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकणार? टॅरिफ वॉरच्या शक्यतेने जगात चिंता

डोनाल्ड ट्रम्प 100 देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकणार? टॅरिफ वॉरच्या शक्यतेने जगात चिंता

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ शुल्क लागू करण्याला 90 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत 9 जुलै रोजी संपणार आहे. कोणत्या देशांना किती टॅरिफ लागू करण्यात आले आहे, याबाबत विचारल्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, सोमवारपर्यंत वाट बघा. यातून जगात पुन्हा टॅरिफ वॉर सुरु होण्याची शक्यता असल्याने जगाची चिंता वाढली आहे.

1 ऑगस्टपासून जगभरातील 100 देशांतून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ट्रम्प टॅरिफ लागू केलं जाईल. जे 10 टक्के असेल. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी याला दुजोरा दिला आहे. स्कॉट बेसेंट यांनी टॅरिफ हा जागतिक व्यापार रणनीतीला व्यापक अशी नवी सुरवात म्हटले आहे. जे देश अमोरिकेसोबत व्यापार करारासंदर्भात चर्चा करत आहेत त्या देशांसह सर्व देशांवर बेसलाईन टॅरिफ व्यापक रुपात लादण्यात येणार आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करणार आहेत त्यांच्या बाबत कशा प्रकारचा व्यवहार करायचा यावर विचार करतोय. मला वाटतं की आम्ही जवळपास 100 देशांची यादी करत आहोत, ज्यांच्यावर किमान 10 टक्के टॅरिफ लागू असेल ते तिथून पुढं वाढू शकते. असे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी टॅरिफबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यात 12 देशांचा समावेश असेल. ट्रम्प यांनी असं म्हटलंय की त्यांनी 12 देशांसाठीच्या व्यापार पत्रावर सही केलेली आहे. या यादीतील देशांनी ते स्वीकारावं किंवा सोडून द्यावं, त्यांना ते पत्र अल्टिमेटमसह सोमवारी पाठवलं जाईल. त्यांनी 12 देशांची नावे जाहीर केलेली नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 100 देशांवर 10 टक्के बेसलाइन टॅरिफची तयारी केली आहे. याशिवाय 12 देशांवर नवं टॅरिफ लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

अद्याप हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर समझोता झालेला नाही. टॅरिफमुळं देशाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. दोन्ही देशातील व्यापार कराराच्या चर्चांना वेग आला आहे. अमेरिकेत दीर्घ काळ चर्चा होऊनही कोणत्याही कराराशिवाय हिंदुस्थानचं शिष्टमंडळ परतलं आहे. अमेरिका भारतावर कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्याची मागणी करत आहे. तर हिंदुस्थान कापड, चामडे आणि रत्न याबाबतच्या तरतुदीसाठी आग्रही आहे. काही गोष्टी वगळता इतर बाबींवर सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Health Tips – महिलांनी गुलकंद खाल्ल्यास मिळतील हे आरोग्यवर्धक फायदे, वाचा Health Tips – महिलांनी गुलकंद खाल्ल्यास मिळतील हे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
गुलकंद हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर लगेच गुलाबाची फुले उभी राहतात. गुलकंद आपण दैनंदिन जीवनात मात्र खात नाही. परंतु अनेकांना...
मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी 12 आरोपींची निर्दोष मुक्तता, पाच जणांची फाशी रद्द
मुंबईत नागरी सुविधांची बोंब, 46 पुरुषांसाठी एक शौचालय; महिलांचीही प्रचंड गैरसोय; तक्रारीत 70 टक्के वाढ
महाडजवळ खासगी बस उलटली; 11 जण जखमी
Skin Care – चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी फक्त 2 रुपये पुरेसे आहेत, वाचा
पैसे परत न दिल्याने लेहंगा चाकूने टराटरा फाडला, कल्याणमधील घटना; कामगारांना धमकावणाऱ्या तरुणाला अटक
वक्फ बोर्डाचा पुण्यात महाघोटाळा, 900 कोटींची जमीन साडेनऊ कोटींना विकली; 19 वर्षांपूर्वी रद्द केलेला निर्णय फिरवला