शहा सेनेच्या एकनाथ मिंध्यांचे જય ગુજરાત
राज्यात मराठी-हिंदी भाषेच्या मुद्दय़ावरून वातावरण तापलेले आहे. त्यातच पुण्यातील एका कार्यक्रमात आज शहा सेनेच्या एकनाथ मिंधे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिला. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या नाऱयावरून महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पुण्यातील काेंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमात शहा सेनेच्या एकनाथ मिंधे यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहांचे तोंडभरून कौतुक केले. ते एवढय़ावरच थांबले नाहीत. त्यांनी आजचा दिवस गुजराती समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. इथे कुठल्या गोष्टीची कमतरता नाहीय. कारण तुम्ही सर्व लक्ष्मीपुत्र आहात, अशी भलामण केली. भाषणाचा समारोप करताना एकनाथ मिंधे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात!’ अशा घोषणा दिल्या.
कुठलेही शहर असो, गृहसंकृल असो, त्या शहराला बाजारपेठ नसेल तर त्याला पूर्णत्व येत नाही. व्यवसाय, बाजारपेठ बनवणारे तुम्ही लोक आहात. तुम्ही व्यापारी आहात. तुमच्याशिवाय कुठल्या शहराची शोभा वाढत नाही, अशा शब्दांत एकनाथ मिंधे यांनी गुजराती समाजाचे काैतुक केले.
शहांच्या घरात गुजराती-मराठी भाषा आनंदाने नांदतात
अमित शहा हे गुजराती असले तरी ते महाराष्ट्राचे जावई आहेत. ते होम मिनिस्टर असले तरी त्यांच्या घरातील होम मिनिस्टर आपल्या कोल्हापूरच्या आहेत. त्यामुळे त्यांच्या घरात गुजराती आणि मराठी या दोन्ही भाषा आनंदाने नांदतात, असेही एकनाथ मिंधे म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List