माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींच्या पुनर्विकासात पालिका कर्मचारी, पोलिसांना घरे द्या! शिवसेनेची विधानसभेत मागणी
बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला. त्याचप्रमाणे माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळींचा पुनर्विकास होत असताना तिथे वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या राहणाऱ्य पालिका कर्मचारी आणि पोलिसांनादेखील मालकी हक्काने घरे देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेने विधानसभेत मुख्यमंत्र्यांकडे केली.
भायखळा विधानसभेतील माझगाव ताडवाडी येथील बीआयटी चाळींचा पुनर्विकास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ घातला आहे. या बीआयटी चाळीत गेल्या अनेक वर्षांपासून पालिका कर्मचारी आणि पोलीस बांधव राहतात. वरळी, नायगाव, ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्य पोलीस बांधवांना म्हाडामार्फत सुरू असलेल्या पुनर्विकासात मालकी हक्काने घरे मिळणार आहेत. त्याचप्रमाणे माझगाव ताडवाडी आणि इतर बीआयटी चाळींचा पुनर्विकास होत असताना या चाळीत वर्षानुवर्षे राहणाऱ्य पालिका कर्मचारी आणि पोलीस बांधवांनादेखील मालकी हक्काने घर मिळावे यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते, भायखळा विधानसभेचे आमदार मनोज जामसुतकर यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List