मालेगाव भूखंड गैरव्यवहार, उपविभागीय अधिकारी निलंबित
नाशिक जिह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहारप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देत बावनकुळे यांनी दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले. तसेच स्टॅम्प वेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधासभेत दिली.
भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मौजे संगमेश्वर येथील सिटी सर्व्हे क्र. 144 अ आणि मौजे गुगळगाव येथील गट क्र. 253 यांच्या बिनशेती परवानगीशिवाय झालेल्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List