गॅसबत्ती, टॉर्च, मशाली घेऊन रात्रीची शोधमोहीम; चविष्ट, खमंग, मुठ्यांवर खवय्यांच्या उड्या

गॅसबत्ती, टॉर्च, मशाली घेऊन रात्रीची शोधमोहीम; चविष्ट, खमंग, मुठ्यांवर खवय्यांच्या उड्या

विक्रमगडसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून मासेमारी बंद असल्याने ग्रामीण भागात ताजे, फडफडीत मासे मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे चिकन, मटणाचे भाव वधारले आहेत. खवय्यांचा मोर्चा आता चविष्ट आणि खमंग मुठ्यांकडे वळला आहे. गॅसबत्ती, टॉर्च, मशाली हाती घेऊन मुठघांना (खेकडे) शोधण्यासाठी रात्रीची मोहीम सुरू झाली आहे. फक्त पावसाच्या सुरुवातीलाच मिळणाऱ्या या लज्जतदार मुठ्यांना ग्रामीण भागातील खवय्यांच्या उड्या पडत आहेत.

पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुठे मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. शहरात 80 ते 100 रुपये डझन या दराने मुठे मिळतात. त्यावर ताव मारण्यासाठी शहरातील चाकरमान्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. माळरान, शेत, शेताचा बांध, डोंगरात बिळ करून राहतात त्यामुळे ते विक्रमगडमधील ग्रामीण भागात सापडतात.

मुठे पकडण्यासाठी खवय्ये हातात गॅसबत्ती, टॉर्च किंवा जळती मशाल घेऊन घराबाहेर पडतात. सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटचे पोते, कळशी किंवा बादली असते. रात्रभर माळरान, शेत, बांध, गवताळ भाग किंवा डोंगर उतारवर फिरून मुठे पकडले जातात. बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जिभेवर पिवळे किंवा लाल रंग दिसणे म्हणजे या आजाराची लक्षणे…, तज्ज्ञांनी सांगितलं हे रंग हलक्यात घेऊ नका? जिभेवर पिवळे किंवा लाल रंग दिसणे म्हणजे या आजाराची लक्षणे…, तज्ज्ञांनी सांगितलं हे रंग हलक्यात घेऊ नका?
आपणअनेकदा पाहिले असेल की जेव्हा जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर प्रथम आपल्या जिभ तपासतात. कारण केवळ चव जाणवण्याव्यतिरिक्त, जीभ...
Mumbai News – मुंबई विमानतळावर कार्गो ट्रकची विमानाला टक्कर, घटनेची चौकशी सुरू
सर्वोच्च न्यायालयच शेवटची आशा, निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव बदलाचा किंवा कोणाला देण्याचा अधिकार नाही – उद्धव ठाकरे
Video – : महाराष्ट्रातला मंत्रीही सुरक्षित नाही- अनिल परब
Video – हा पुरोगामी विचारांवर हल्ला – विजय वडेट्टीवार
देवेंद्र फडणवीसांच्या आदेशालाच केराची टोपली; वगळलेला ‘स्मार्ट’ ठेकेदार 750 कोटींच्या टेंडरला ठरला पात्र, राजकीय वर्तुळात चर्चा
रत्नागिरीत 94 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; या ठिकाणी होणार महिला सरपंच