कल्याण-डोंबिवलीत अघोषित रिक्षा दरवाढ; रिक्षाचालकांच्या मनमानीने प्रवाशांच्या खिशाला कात्री

कल्याण-डोंबिवलीत अघोषित रिक्षा दरवाढ; रिक्षाचालकांच्या मनमानीने प्रवाशांच्या खिशाला कात्री

कल्याण-डोंबिवलीत रिक्षा प्रवास करणे सामान्य प्रवाशांसाठी अधिकाधिक खर्चिक ठरत असून अलीकडे रिक्षाचालकांनी अघोषित भाडेवाढ लागू करत प्रवाशांकडून मनमानीपणे पैसे वसूल करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रवाशांकडून सरसकट तीन, पाच ते दहा रुपये अधिक आकारले जात आहेत. रिक्षाचालक बेकायदा प्रवाशांच्या खिशाला कात्री लावत असतानाही पोलीस, आरटीओ बघ्याची भूमिका घेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात बहुतांश नागरिक ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये नोकरी-व्यवसायासाठी दररोज प्रवास करतात. स्टेशनपासून दूर राहत असल्याने त्यांना स्थानिक वाहतुकीसाठी रिक्षांवरच अवलंबून राहावे लागते. सार्वजनिक वाहतूक वेळेवर उपलब्ध न झाल्याने शेअरिंग रिक्षा ही त्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी एकमेव पर्याय ठरते. परंतु रिक्षाचालक प्रवाशांच्या या अडचणीचा गैरफायदा घेत असून याआधीही 2022 मध्ये त्यांनी मनमानी भाडेवाढ केली होती. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी स्टेशन परिसरात अधिकृत दरफलक लावले होते. मात्र काही दिवसांतच हे फलक गायब झाले आणि भाडेवाढ पुन्हा मूळ पदावर आली.

यावेळीही सीएनजीच्या दरवाढीचे कारण देऊन रिक्षाचालकांनी नव्याने दरवाढ केली आहे. दुपारच्या वेळेत, पावसाळ्यात किंवा लांबपल्ल्याचा प्रवास करताना शेअरिंग रिक्षा सहज मिळत नसल्याने प्रवासी मीटर रिक्षांचा पर्याय निवडतात. मात्र आता मीटर रिक्षांचे दरही भरमसाठ वाढवले असून प्रवाशांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे रिक्षा भाडेवाढीवर तातडीने अंकुश घालावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

भाडेवाढीचा वरवंटा

पूर्वीचे भाडे       सध्याचे भाडे      भाडेवाढ
१५ रुपये          १८ रुपये         ३ रुपये
२२ रुपये          २५ रुपये        ३ रुपये
४० रुपये          ५० रुपये        १० रुपये

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;