बिहारचा तोतया आयएएस अधिकारी अटकेत

बिहारचा तोतया आयएएस अधिकारी अटकेत

बिहार राज्याचा आयएएस अधिकारी असल्याचे भासवून एकाने सीमा शुल्क विभागाच्या बीकेसी येथील पन्हाळा शासकीय विश्रामगृहात ठगाने मुक्काम केल्याचा प्रकार समोर आला. अखेर त्या तोतया आयएएसला गुन्हे शाखेच्या युनिट 12ने ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

लक्ष्मण बागवे हे गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट 12मध्ये कार्यरत आहेत. शनिवारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, चव्हाण, सावंत, बिचकर, राणे, गोरुले यांचे पथक गस्त करत होते. गस्ती दरम्यान राऊत यांना महत्त्वाची माहिती मिळाली. मालाड पश्चिमच्या डी मॉंटी लेन येथे एक वाहन उभे आहे. त्या वाहनावर ‘भारत सरकार’ अशी पाटी लावली आहे. गाडीत बसलेला एक जण हा स्वतःला आयएएस अधिकारी असल्याचे भासवत असल्याचे समजले. त्यानंतर राऊत यांचे पथक तेथे गेले. गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या एकाला ताब्यात घेतले. चंद्रमोहन प्रसाद रामबली सिंग असे त्याने त्याचे नाव सांगितले. पोलिसांनी एक वाहनदेखील ताब्यात घेऊन अटक केली.

म्हणून त्याने बनवले खोटे ओळखपत्र

चंद्रमोहन हा 2016पासून आयएएसची परीक्षा देत होता. मात्र त्याला यश आले नाही. त्याच्यासोबत त्याचे मित्र पास होऊन ते आयएएस झाले. त्याच दरम्यान त्याला गावी परीक्षा पास झाला की नाही याबाबत विचारणा करायचे. त्यामुळे त्याने ते बनावट ओळखपत्र बनवल्याचे तपासात समोर आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;