कोलकाता बलात्कार प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज समोर, आरोपी पीडित तरुणीला जबरदस्तीने नेतानाची दृश्य कैद
दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजच्या एका 24 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यामध्ये दोन आरोपी पीडीत तरुणीला कॉलेज गेटपासून ओढत घेऊन जाताना दिसत आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याने इतर दोघांच्या मदतीने जबरदस्तीने कॉलेजच्या गार्ड रूममध्ये घेऊन जाण्यास सांगितले. आणि तिथेच आपल्यावर बलात्कार झाल्याचे तरुणीने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी पीडितेला जबरदस्तीने नेत असल्याचे स्पष्ट दिसत
आहे. पीडित विद्यार्थिनीने लग्नासाठी नकार दिल्यामुळे तिला सामूहिक बलात्काराचा सामना करावा लागला असा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात मनोजित मिश्रा, प्रमित मुखर्जी, झैद अहमद आणि कॉलेजच्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. मनोजितवर बलात्काराचा आरोप आहे, तर इतर दोघांनी त्याचे व्हिडीओ शूट करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List