भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90 हजार विद्यार्थी नापास, द्रमुक मंत्र्यांचा दावा

भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90 हजार विद्यार्थी नापास, द्रमुक मंत्र्यांचा दावा

भाषा लादल्यामुळे कर्नाटकात बोर्डाचे 90 हजारहून अधिक विद्यार्थी नापास झाले असा दावा तमिळनाडूतील द्रमुकचे मंत्री अन्बिल महेश पोय्यमोळी यांनी केला आहे. पोय्यमोळी हे तमिळनाडूचे शिक्षणमंत्री असून एका शालेय स्पर्धेदरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.

अन्बिल पोय्यमोळी म्हणाले की, भाषेचे शिक्षण हे विद्यार्थ्यांची पसंती असावी. “तिसरी भाषा ही एक पर्याय असावा, त्याचे बंधन नसावे,” तसेच शैक्षणिक धोरणात लवचिकतेची गरज असावी असेही पोय्यमोळी म्हणाले.

केंद्र सरकार तामिळनाडू आणि केरळसारख्या चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेला निधी रोखत आहे असेही अन्बिल पोय्यमोळी म्हणाले. तसेच केंद्र सरकार शिक्षणाचा निधी रोखून राज्यांना धमकावत आहे. पण शिक्षणावरचा खर्च राज्य सरकार करणार असे आश्वासन मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दिले आहे असेही पोय्यमोळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;