जंगल बुक – नीरवतेचा नाद

जंगल बुक – नीरवतेचा नाद

>> अमोल हेंद्रे

मसाईमाराचा दौरा अविस्मरणीय ठरला. तिकडच्या जंगलात एकदा तीन चित्त्यांनी कमाल केली. ते डुकरांच्या कळपावर नजर ठेवून होते. त्या डुकरांनी अचानक धावायला सुरुवात केली. त्यांच्या कळपाला कुठे पळावं सुचेना. तेवढय़ात एका चित्त्याने एका डुकराला मागून पकडलं व त्याच्या गुदद्वाराचा चावा घेतला… आणि रानडुकराचा खेळ खल्लास झाला!

पुराणकथांमध्ये `वनवास’ हा शाप मानला जातो. श्रीरामाच्या वाटय़ाला वनवास आला अन् पुढे रामायण घडलं. माझ्या वाटय़ालाही वनवास आला. तो अजून सुरू आहे. याला आता वीस वर्षांहून अधिक काळ लोटला. हा वनवास मी स्वेच्छेने निवडला आहे. म्हणून मला ताडोबा, जिम कॉर्बेट, पेंच, कान्हा, बांधवगड, पेरियार, दुधवा, गीर, सुंदरबन ही जंगलं अभ्यासता आली. तिकडचा निसर्ग, झाडंझुडपं, पक्षी, हिंस्र श्वापदे यांच्याशी हितगुज करता आली. हा झाला आपल्या देशातला वनवास! परदेशामल्या जंगलांविषयी सांगायचं झालं तर सरांगेत्ती, लेक नकुरा, मसाईमारा, टांझानिया, सुमात्रा, गुइनिया अशा कितीतरी महाकाय जंगलांविषयी सांगता येईल. भूतलावरची शक्य तेवढी सगळी जंगले मी पालथी घातली आहेत. त्यातील श्वापदं, हरणं, वानरांपासून जिराफ, गेंडा, वाघ, सिंह यांच्या कथा सांगायच्या झाल्या तर एक मोठं पुस्तक कमी पडेल, पण जंगलातला खरा थरार म्हणजे शिकार! ही मोठय़ा प्राण्यांनी छोटय़ा प्राण्यांची केलेली शिकार पाहणं कमी लोकांच्या नशिबी येतं. मी वारंवार जंगलात जात असल्यामुळे मला शिकार पाहण्याची संधी अनेकदा मिळाली. त्यातल्या काही शिकारींची आठवण झाली की, आजही अंगावर काटा येतो, छातीची धडधड वाढते अन् घशाला कोरड पडते.

केनियातल्या लेक ररुला जंगलात माझी दुसरी वारी होती. काहीतरी घडणार असं माझं अंतर्मन मला सांगत होतं. माझी नजर भिरभिरत होती. माझ्या नजरेचा माझी कॅमेरा लेन्स पाठलाग करत होती. इतक्यात आमच्या जवळच्या झुडुपातून एक सिंहीण बाहेर आली. ती आमच्या जीपच्या समांतर रेषेत दबक्या पावलांनी चालत होती. आम्ही तिच्या खिजगणतीतही नव्हतो. ती पाय थोडे दुमडून चालत होती. ते दृश्य पाहून ती सिंहीण सावजाचा अंदाज घेतेय हे लक्षात आलं. गंमत म्हणजे तिची नजर एका बिंदूकडे स्थिरावलेली होती. आम्ही थोडय़ा दूरवर पाहिलं तर एक चट्टेरीपट्टेरी झेब्रा निवांत चरत होता. कोणालाही चाहूल लागू न देता सिंहिणीने आक्रमण केलं. झेब्य्राला चाहूल लागली. त्यानेही क्षणात वेग घेतला आणि सुरू झाला जीवघेणा पाठलाग! दोन-तीन वेळेस झेब्य्राने हुलकावणी दिली. तिसऱ्या हुलकावणीला त्या हिंस्र श्वापदाने झेप घेतली ती थेट झेब्य्राच्या मानगुटीवर. तिने दोन अजस्त्र पंज्यांत झेब्य्राला पकडलं आणि तीक्ष्ण दातांनी त्याच्या नरडीचा घोट घेतला. रक्त पिताना सिंहिणीला धाप लागत होती. रक्त प्राशन आणि झेब्य्राची हड्डी मोडत असल्याचा विचित्र, भयाण आवाज येत होता. निसर्गालाही जणू कल्पना होती की, झेब्य्राचा नाहक बळी गेला. त्या स्मशान शांततेत झेब्य्राची केविलवाणी धडपड हळूहळू निवांत होत गेली. उदास मनाने आम्ही तिथून निघालो. त्या वेळी नीरवतेचा नाद लोप पावला होता.

मसाईमाराच्या जंगलातल्या तीन चित्त्यांनी एकदा तर कमाल केली. तुफान वेगाने ते आमच्यासमोर आले आणि एका मोठय़ा डुकराला आडवं पाडलं. डुक्करही मजबूत होतं. तीन चित्ते आणि एक डुक्कर असा सामना आमच्या समोर काही अंतरावर सुरू झाला. डुक्कर जोरजोरात ओरडू लागलं. त्याचा आक्रोश कर्कश होता. झटापटही जोरात सुरू होती. चित्त्यांना तो मानायला तयार नव्हता. मध्येच डुकराने विष्ठा विसर्जन केलं. ते पाहून एक चित्ता दूर झाला, पण इतर दोघं ऐकायला तयार नव्हते. एकजण डुकराच्या समोरून हल्ला करत होता. त्याला डुकराच्या नरडय़ाचे वेध लागले होते. इतक्यात दुसऱ्या चित्त्याने डुकराच्या गुदद्वाराचा चावा घेतला. तेव्हा मला आठवलं, प्रेमात आणि युद्धात सर्व ( ! ) काही माफ असतं. मग ते रानडुक्कर थकलं, पाय झाडू लागलं. काही क्षणांत  ते निष्प्राण झालं. खेळ खल्लास! चित्त्यांना धाप लागली होती तरी त्यांची रक्ताची तहान भागली नव्हती. तिघांचीही तोंडे रक्ताने माखली होती. तो प्रसंग मोठा विलक्षण होता. रक्तबंबाळ डुक्कर मरणयातनांतून मुक्त झालं होतं. चित्त्यांनी आजूबाजूला पाहिलं अन् आपली शिकार फरफटत झुडुपात खेचत नेली. सारं नि:शब्द झालं होतं. बहुधा झुडुपात त्यांची मेजवानी सुरू झाली असावी. तो नीरवतेचा नाद अनुभवत आम्ही मसाईमारातून बाहेर पडलो.

[email protected]

ह शब्दांकन : निलय वैद्य 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला उपचारादरम्यान वाघाचा प्राणीरक्षकावर हल्ला
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वैद्यकीय पिंजऱ्यामध्ये उपचार करतेवेळी टी-5 या वाघाने प्राणीरक्षकावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या रक्षकाने...
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर, शिलाँग कोर्टाचा निर्णय
Pune News – बारामती पालखी महामार्गावर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू
IND vs ENG 3rd Test – टीम इंडियाची घोडदौड 387 धावांवर थांबली, तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त; इंग्लंडने घेतली आघाडी
Baloch Army Attack – बलूच सैन्याच्या हल्ल्यात 50 पाकिस्तानी सैनिक ठार, बीएलएफचा दावा
Jammu Kashmir – एसयूव्ही कार 600 फूट दरीत कोसळली, 5 जणांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
Ratnagiri News – पळवून लावलं तरी बिबट्या गुरांच्या गोठ्यातच येऊन बसायचा, अखेर वनविभागाने केले जेरबंद