डिंभे कालव्यावरील पूल कोसळला; नागरिकांच्या अडचणी वाढल्या

डिंभे कालव्यावरील पूल कोसळला; नागरिकांच्या अडचणी वाढल्या

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ परिसरातील उदारमळा येथील हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) डाव्या कालव्यावरील पूल कोसळला आहे. ही घटना सोमवार दि. 2 रोजी घडली. सुदैवाने पुलावर कोणतेही वाहन अथवा पादचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पूल नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून युद्धपातळीवर पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी केली आहे.

महाळुंगे पडवळ येथील उदारमळा, बेंदवस्ती, घायाळमळा, आंबटकर, ठाकरवाडीतील नागरिकांना कालव्यावरील पूल हा महाळुंगे पडवळ गावात ये-जा करण्यासाठी कालव्यावरील पूल एकमेव रस्ता आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागामार्फत ९० साली पुलाचे बांधकाम केले होते. या पुलावरून दररोज जवळपास मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करतात. यात विशेषतः शेतीमाल व दूध वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते तसेच परिसरातील नागरिक व शाळकरी मुलांची या पुलावरून वर्दळ आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांना सरपंच सुजाता चासकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल पडवळ, राहुल पडवळ, उदय आंबटकर, भगवान उदार, नाना घायाळ आदींनी घटनेची माहिती दिली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचा शेती व दुग्ध व्यवसाय असल्याने हा पूल कोसळल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गवळ्यांना दूध गाडीपर्यंत पोहोचविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. पुलाचा राडारोडा पाण्यात कोसळल्यास कालवा फुटण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;