ईदच्या कालावधीत गुरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश मागे

ईदच्या कालावधीत गुरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश मागे

राज्यात कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी आहे. या कायद्याचा आधार घेऊन राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे पत्र गोसेवा आयोगाने जारी केले होते. ईदच्याच कालावधीत ही बंदी घातली गेल्याने मुस्लिम समाजाने त्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शासनमान्य आयोगाने काढलेले हे वादग्रस्त पत्र मागे घेण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोसेवा आयोगाचे पत्र मागे घेतल्याची माहिती दिली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 8 जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवावेत असे आदेश या पत्राद्वारे आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले होते. त्यामुळे ईदसाठी कुर्बानीची परंपरा राखण्यासाठी बकरी मिळणे कठीण झाले होते.

ईद सणानिमित्त कायदा-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत मुस्लिम समाजातील आमदारांनी गोसेवा आयोगाचे पत्र मागे घ्यावे अशी विनंती केली होती. तसेच गोवंशाच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात, हप्ते घेतात, वाहन चालकांना मारहाण करतात. अशी बेकायदेशीर कामे करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;