ज्योती मल्होत्राला बांगलादेशला का जायचे होते? मोठा खुलासा
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा यांच्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. हरियाणा पोलिस आणि तपास यंत्रणेने केलेल्या तपासात असे दिसून आले आहे की ज्योती पाकिस्तान आणि चीननंतर बांगलादेशला जाण्याचा विचार करत होती. बांगलादेशला जाण्यासाठी तिने भरलेल्या अर्जावरून समोर आले आहे.
परंतु या अर्जात अशी कोणतीही तारीख नमूद केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने हा फॉर्म भरण्यात आला आहे, त्यावरून हे स्पष्ट होते की अलीकडेच ज्योती मल्होत्राने बांगलादेशला जाण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, ज्योती मल्होत्राचा कबुलीजबाबही समोर आला आहे. यावरुन स्पष्ट होते की, ती पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती आणि ती सतत पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशच्या संपर्कात होती. ज्योतीने तिच्या जबाबात पोलिस आणि तपास यंत्रणांना सांगितले की, मी 2023 मध्ये पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेलो होते.”
यासोबतच तिने सांगितले की, “पाकिस्तानात, अली हसनने माझी पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत भेट आयोजित केली आणि तिथे मी शकीर आणि राणा शाहबाज यांनाही भेटलो. मी शकीरचा मोबाईल नंबर घेतला आणि शकीरचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये ‘जाट रंधावा’ नावाने सेव्ह केला जेणेकरून कोणीही माझ्यावर संशय घेऊ नये. त्यानंतर मी हिंदुस्थानात परत आले.” त्यानंतर मी व्हॉट्सअॅप, स्नॅप चॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांच्या संपर्कात राहिलो आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागलो. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटले.”
ज्योती म्हणाली, “मी पाकिस्तान उच्चायुक्तालयात अहसान-उर-रहीम उर्फ दानिशला भेटलो. मी दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि त्याच्याशी बोलू लागले. त्यानंतर मी दोनदा पाकिस्तानला गेलो, जिथे मी दानिशच्या ओळखीच्या अली हसनला त्याच्या विनंतीवरून भेटलो. अली हसनने माझ्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली.”
33 वर्षीय ज्योती मल्होत्राला 17 मे रोजी हरियाणाच्या हिसार पोलिसांनी अटक केली होती, जिथून तिला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले होते. आज (21 मे) त्याच्या रिमांडचा शेवटचा दिवस आहे. यानंतर, हरियाणातील हिसार येथील ३३ वर्षीय युट्यूबर ज्योती मल्होत्राचे वडील हरीश मल्होत्रा यांनी सांगितले होते की, ती काही काम असल्याचे सांगून चार-पाच दिवसांसाठी दिल्लीला जात असे. ते म्हणाले की, ती पाकिस्तानला कधी गेली हे मला माहित नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List