पाऊस झाल्याने यंदा वारीला गर्दी वाढणार; प्रशासनाकडून काटेकोर नियोजन

पाऊस झाल्याने यंदा वारीला गर्दी वाढणार; प्रशासनाकडून काटेकोर नियोजन

यंदा पावसाचे प्रमाण पाहता, पालखीला जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नियोजनामध्ये वाढ करण्यात येणार आहे. एकत्रित नियंत्रण कक्ष, पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग केला जाणार असून, त्यासाठी ‘वॉच टॉवर’ उभे केले जाणार आहेत.

आषाढी वारीच्या पूर्वतयारीसाठी पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील प्रशासनाची बैठक अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या तीनही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तसेच पालख्यांच्या संस्थानांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

द्विवेदी म्हणाल्या, ‘गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्य मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच पालखी मार्गाला जोडल्या जाणाऱ्या कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, कामे सुरू असलेल्या ठिकाणचा रस्त्यांवरील राडारोडा उचलणे, मुरुमीकरण करणे आदी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.

गर्दी नियंत्रणासाठी ‘एआय’चा वापर
पंढरपूर आणि वाखरी येथे गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. एकात्मिक नियंत्रण कक्ष उभा करण्यात येणार असून, कक्षातील सर्व विभागांच्या प्रमुखांना वॉकी-टॉकी देण्यात येणार आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

शौचालयासाठी घरांवर पांढरे झेंडे
‘खासगी कुटुंबांनी वारकऱ्यांसाठी आपली शौचालये वापरास देण्याची इच्छा दर्शविली आहे. अशा घरांवर पांढरे झेंडे लावून पालखी सोहळ्यात माहिती देण्यात येणार आहे,’ असे साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.

हिरकणी कक्ष, मेडिकल किट
जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माउली पालखीसाठी 1800, संत तुकाराम महाराज पालखीसाठी 1200, तर संत सोपानदेव महाराज पालखीसाठी 200 टैंकर्सची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मान्सूनचा प्रवास थंडवणार, महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी अपडेट, IMD च्या नव्या अंदाजानं चिंता वाढली मान्सूनचा प्रवास थंडवणार, महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी अपडेट, IMD च्या नव्या अंदाजानं चिंता वाढली
यंदा वेळेपूर्वीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, सर्वसाधारण स्थितीमध्ये मान्सून महाराष्ट्रात सात जून रोजी प्रवेश करतो, मात्र यंदा तब्बल 12...
अक्षय कुमार पत्नी किंवा मुलांचा नाही, तर या खास व्यक्तीचा फोटो त्याच्या पाकिटात ठेवतो, सर्वांनाच वाटलं कौतुक
अभिनेत्री दीपिका कक्करला स्टेज-2 Liver Cancer; या सुरुवातीच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
Jalna news देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात, 8 जण जखमी
महादेव मुंडेंचे मारेकरी इतक्या महिन्यानंतरही मोकाट, तपासाला गती द्या; सुप्रिया सुळे यांची मागणी
वैष्णवी हगवणेचे सासरे व दिराला तीन दिवसांची तर पती, सासू व नणंदेला एका दिवसाची पोलीस कोठडी
हिंदुस्थानला शांतता हवी, पण दहशतवाद्यांना शिक्षा होणारच; शशी थरूर यांनी पाकिस्तानला सुनावले