Hair Care- सुंदर घनदाट केसांसाठी ‘या’ फुलांचा वापर आहे गरजेचा, वाचा

Hair Care- सुंदर घनदाट केसांसाठी ‘या’ फुलांचा वापर आहे गरजेचा, वाचा

केस हा आपल्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जास्वंद केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांच्या वाढीसाठी जास्वंद फुलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. या फुलाच्या वापराने केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. तसेच या फुलामुध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनोइड्स, एमिनो अॅसिड, म्यूसिलेज फायबर, आर्द्रता आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे केसांसाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. निरोगी केसांसाठी जास्वंद हेअर मास्क खूप गरजेचा आहे.

कसा कराल जास्वंद हेअर मास्क 

याकरता 6 ते 8 ताजी लाल जास्वंदीची फुले घ्यावीत. यामध्ये काही जास्वंदीच्या झाडाची पानेही घ्यावीत. चांगले धुवून मिक्सरमधून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. सुमारे एक तास तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर डोके धुवावे. निरोगी केसांसाठी तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

जास्वंद आणि नारळाचे तेल केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

जास्वंद आणि दही हेअर मास्क

3 ते 4 ताजी जास्वंद फुले नीट धुवून त्याची पेस्ट बनवावी. फुलांच्या पेस्टमध्ये 2-3 चमचे ताजे दही घाला आणि दोन्ही चांगले मिसळा. हे सर्व  केसांवर लावून चांगला मसाज करावा. एकदा पूर्ण झाल्यावर, आपले केस शॉवर कॅपने झाकून ठेवा आणि एक तास मिश्रण तसेच ठेवावे. त्यानंतर केस धुवावेत.

जास्वंद नारळ तेल हेअर मास्क कसा कराल?

6 ते 8 ताजी लाल जास्वंद आणि थोडी जास्वंदीची पाने घ्यावीत. सर्व नीट धुवून घ्यावे. बारीक करून एक पेस्ट बनवावी. यामध्ये थोडे खोबरेल तेल घालावे. ते एकत्र मिसळून मिश्रण केसांवर नीट लावावे. किमान 45 ते 60 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर सौम्य शैम्पू वापरून कोमट पाण्याने डोके धुवावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार
एसटी महामंडळाच्या नव्या  बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून निगराणी...
सोसाट्याचा वारा अन् तुफान सरी, मुंबईत पुन्हा पाऊस; लोकलच्या वेळापत्रकाचं काय?
“यै मौसम का जादू है मितवा…”, पावसात धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा छत्री घेऊन रेन डान्स
ऐश्वर्या नारकरांच्या मुलाचा एअरपोर्टवर खुल्लम खुल्ला रोमान्स; पहा व्हिडीओ
वडिलांचे अफेअर्स असूनही आई घटस्फोट का देत नाही? सूरज पांचोलीने सांगितलं खरं कारण
जेनिफर विंगेटने करण सिंह ग्रोवरला का दिला घटस्फोट? कारण वाचून तुम्हीही व्हाल चकीत!
Skin Care- चेहऱ्यावर साखर लावा, सुरकुत्या घालवा! वाचा सविस्तर