देशात सरकारविरोधात बोलल्यास ईडी, सीबीआय मागे लागण्याची भीती, जावेद अख्तर यांचे परखड मत
देशात आपण सरकारविरोधात बोललो तर ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्सवाले आपल्या मागे लागतील याची भीती सेलिब्रिटींना वाटते. ही समस्या फक्त चित्रपटसृष्टीतील लोकांची नाही, तर बाहेरच्या लोकांचीही आहे, असे परखड मत प्रसिद्ध गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.
जगभरात, विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये, कलाकार सरळसरळ राजकीय मुद्दय़ांवर आपली भूमिका घेतात. अमेरिकेतील ‘ऑस्कर’ पुरस्कार समारंभात मेरिल स्ट्रीपसारखे कलाकार सरकारवर थेट टीका करतात. पण आपले कलाकार गप्प का आहेत? आधी तर असं नव्हतं, असा प्रश्न एका मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी केला. यावर जावेद अख्तर यांनी इथे सरकारविरोधात बोलल्यास आपल्या फाईल्स उघडल्या जातील याची भीती आहे. मेरिलने सरकारवर टीका केली, पण तिच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला नाही. इथे मात्र असे होऊ शकते म्हणूनच कलाकार शांत राहतात. कारण त्यांना आर्थिक आणि इतर अडचणी येऊ शकतात, असे जावेद अख्तर म्हणाले.
n बॉलीवूडमधील अनेक कलाकार मोठय़ा नावाने ओळखले जात असले तरी त्यांचे आर्थिक स्थैर्य तेवढेही चांगले नाही. सर्व बॉलीवूड कलाकारांना एक उद्योगपती आपल्या खिशात ठेवू शकतो. जर आपण पाहिले तर ज्यांच्याकडे पैसा आहे, जे मोठे आहेत, ते तरी कुठे बोलतात? कुणीच बोलताना दिसत नाही, असे स्पष्ट मत जावेद अख्तर यांनी मांडले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List