Chandrapur: घरकुलसाठीची मोफत रेती आणायला गेले दिवसभर थांबून रिकाम्या हाताने परतले; लाभार्थी हतबल

Chandrapur: घरकुलसाठीची मोफत रेती आणायला गेले दिवसभर थांबून रिकाम्या हाताने परतले; लाभार्थी हतबल

यंदा मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झाले मात्र रेती घाटांचे लिलाव रखडल्याने घरकुल बांधकामाचे काम बंद अवस्थेत पडले होते 22 मे पासून पाच ब्रास रेती लाभार्थ्यांना मोफत देण्याचे धोरण सरकारने आखले. मात्र ही योजना आता फक्त कागदोपत्री दिसत असून प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील 55 लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती देण्याचे शासनाने ठरवले. त्यानुसार महसूल विभागाचे कर्मचारी सकाळी शासनाने रेती उत्खननासाठी ठरवून दिलेल्या तारडा कुलथा शेतशिवारातील 229 सर्वे नंबर येथे लाभार्थी, मजूर, नोंद केलेल्या ट्रॅक्टर पोहोचल्या मात्र मान्सून पूर्व पाऊस आला नाही नेमून दिलेल्या सर्वे नंबरच्या परिसरात पावसामुळे अडचण निर्माण झाली आहे. पावसामुळे ट्रॅक्टर फसत असल्याने अखेर लाभार्थी रिकाम्या हातानेच घरी परतले. सकाळी 6 पासून रेती काढण्यासाठी प्रयत्न केले असता सायंकाळपर्यंत एकही ब्रास रेती बाहेर न निघाल्याने अखेर रिकामे ट्रॅक्टर व घरकुल लाभार्थी हिरमोड होऊन संताप व्यक्त करत घरी परतले.

एकीकडे शेतीचा हंगाम सुरू असून दुसरीकडे मात्र शासन 9 जून पर्यंत रेती नेण्याचे आवाहन करत आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी हा दुहेरी संकटात सापडलेला आहे. शेतीची मशागत करायची की घरासाठी रेती न्यायची प्रश्न नागरिकांकडून निर्माण झाला असून पावसामुळे रेती उपसा करणे कठीण झाले असून मोफत रेती योजना डोखेदुखी ठरत आहे. ज्या रेती घाटातून रेती निघेल त्या घाटातून रेती नेण्याची परवानगी शासनाने द्यावी अशी मागणी आता घरकुल लाभार्थ्यांकडून केल्या जात आहे.

(GharKul Beneficiaries Helpless After Failed Free Sand Collection Drive)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Nitesh Rane : हा भाऊचा धक्का, कराची बंदर नाही, हिरव्या सापांची….नितेश राणेंकडून वॉर्निंग Nitesh Rane : हा भाऊचा धक्का, कराची बंदर नाही, हिरव्या सापांची….नितेश राणेंकडून वॉर्निंग
कणकवलीचे आमदार आणि राज्याचे मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी आज भायखळा येथील भाऊचा धक्का बंदराला भेट दिली. भाऊचा धक्क्यावर कोळणींकडून मासेविक्री...
मिठी नदी घोटाळा प्रकरण; डिनो मोरियाच्या अडचणी वाढणार, पुन्हा एकदा चौकशीसाठी दाखल
‘डर्टी पीआर गेम्स’च्या आरोपांवर दीपिकाचं दिग्दर्शकाला सडेतोड उत्तर; माझ्या निर्णयावर..
मोंदींसमोर गेले अन्…राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री स्वीकारण्याआधी अशोक सराफांच्या त्या कृतीने सर्वांची मनं जिंकली
चहलसोबत घटस्फोटानंतर पूर्णपणे बदललं धनश्रीचं आयुष्य; पहिल्यांदाच सोडलं मौन
मॉर्निंग वॉक की इव्हिनिंग वॉक? पोट कमी करण्यासाठी कोणत्या वेळी वॉक करणे ठरेल फायदेशीर
Skin Care- अंघोळीनंतर चुकूनही चेहऱ्यावर या गोष्टी लावू नका, वाचा