पार्किंगचा वाद शिगेला…सोसायटी सचिवाला कालशिलात लगावली; राग अनावर झाल्याने थेट नाकाचा घेतला चावा
कानपूरच्या रतन प्लॅनेट हायराईज सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पार्किंगच्या वादात, आयात-निर्यात विभागाचे उपसंचालक क्षितिज मिश्रा यांनी त्यांच्या पदाचा आणि शक्तीचा गैरवापर केल्याचे दिसून आले. पार्किंगच्या वादातून क्षितिज मिश्रा यांनी सोसायटीच्या सचिव आर.एस. यादव यांच्यावर हात उचलला. एवढेच नाही तर त्यांच्या नाकाचाही चावा घेतला. यामुळे आर.एस. यादव यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे. ही संपूर्ण घटना सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सोसायटीचे सचिव आर.एस. यादव यांच्या मुलीने या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. उपसंचालक क्षितिज मिश्रा यांनी रात्री माझ्या वडिलांना फोन केला. माझ्या पार्किंगमध्ये दुसऱ्याची गाडी उभी आहे, ती लगेचच काढून टाका, असं ते रागात म्हणाले. तेव्हा त्यांना पप्पांनी सांगितले की ही गाडी आमची नाही, आम्ही ती कोणाची आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. हे ऐकून क्षितिज मिश्रा आणखी भडकले आणि त्यांनी पप्पांना बाहेर बोलावले. बाहेर येताच त्यांनी पप्पांच्या कानाखाली मारायला सुरुवात केली.
दरम्यान, पप्पांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते ऐकायला तयारच नव्हते. ते खूप चिडले होते. तेव्हा त्यांनी पप्पांची मान धरली आणि दातांनी त्याचे नाक चावले. त्यामुळे पप्पांच्या नाकाचा तुकडा पडला होता आणि नाकातून प्रचंड रक्तस्त्राव होतं होता. त्यांना खूप त्रास होतं होता त्यामुळे ते खूप ओरडतं होते. मात्र कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. यानंतर आरोपी तेथून निघूनही गेला. पण तरीही त्याला कोणी जाब विचारला नाही, असे आर.एस. यादव यांच्या मुलीने सांगितले.
या घटनेमुळे आर.एस. यादव यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता डॉक्टरांनी नाकावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर यादव कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List