Monsoon Hair Care- पावसाळ्यातील केसगळतीवर अचूक इलाज, केसांच्या समस्या दूर करणाऱ्या मेथीचे अगणित फायदे

Monsoon Hair Care- पावसाळ्यातील केसगळतीवर अचूक इलाज, केसांच्या समस्या दूर करणाऱ्या मेथीचे अगणित फायदे

पावसाळ्यात केस भिजल्यानंतर ते पटकन सुकत नाहीत. त्यामुळे केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणात डोकं वर काढते. केसगळतीची समस्या केवळ स्त्रियांपुरती मर्यादीत नाही. तर केसगळतीमुळे पुरुषही त्रस्त आहेत. पावसाळ्यात केस लवकर सुकले जात नाहीत, त्यामुळे केसगळती वाढू लागते. अशावेळी नैसर्गिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले तेल केसांना लावण्याचेही अनेक फायदे आहेत. अशीच एक रेसिपी म्हणजे मेथीचे दाणे आणि नारळाचे तेल. हे मिश्रण केसांमध्ये जादुई फरक आणते आणि केसांना आणि टाळूला पोषण देते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, पावसाळ्यामध्ये मेथी दाणे आणि खोबरेल तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते. तसेच केसगळतीही मोठ्या प्रमाणात कमी होते.

केसगळती कमी होण्यासाठी तेल
2 चमचे मेथीचे दाणे आणि मूठभर कढीपत्ता 100 मिली नारळाच्या तेलात 10-15 मिनिटे उकळवा. नंतर हे तेल थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तेल गाळून बाटलीत भरा. शॅम्पू करण्यापूर्वी या तेलाने मसाज करा.

केसांचा कोरडेपणा कमी होतो
केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नारळाचे तेल आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवलेले तेल लावू शकता. यामुळे उत्तम पोषण मिळते. पोषण मिळाल्याने केस मऊ आणि रेशमी होतात आणि केसांची ताकदही वाढते.

केसांची वाढ होण्यासाठी
नारळाच्या तेलात लॉरिक अ‍ॅसिड असते, यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. त्याचप्रमाणे मेथीमध्ये आढळणारे प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड सारखे घटकांमुळे केसांची वाढ होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;