20 कोटी रुपयांचं कर्ज, जीवे मारण्याची धमकी; मित्तल कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली धक्कादायक माहिती
प्रवीण मित्तल हे आधी उत्तराखंडमध्ये राहत होते. मित्त यांची हिमाचल प्रदेशमध्ये भंगाराचा कारखाना होता. त्यांनी व्यवसायासाठी 20 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. हे वेळत न फेडल्याने बँकेने त्यांचा कारखाना, राहतं घर आणि गाडी जप्त केली होती. त्यानंतर
हरयाणात एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कुटुंबावर 20 कोटी रुपयांचं कर्ज होतं अशी माहिती या कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिली आहे. तसेच कर्ज न फेडल्यास त्यांना जिवे मारण्याची धमकीही आली होती असेही नातेवाईकांनी म्हटले आहे. उत्तराखंड सोडून मित्तल कुटुंब दुसरीकडे स्थायिक झाले. घर चालवण्यासाठी मित्तल टॅक्सी चालवत होते. मित्तल यांनी आपल्या चिठ्ठीत आपले चुलत भाऊ संदीप अग्रवाल अंत्यसंस्कार करतील असे नमूद केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List