लडाखमध्ये सर्वाधिक 477 हिमबिबटे
हिम बिबटय़ा (स्नो लेपर्ड) ही पँथेरा वर्गातील मोठय़ा मांजरीची प्रजाती आहे. शिकार आणि इतर कारणांमुळे हा प्राणी नामशेषत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्याच्या संरक्षण आणि संवर्धनसाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. अशातच लडाखमध्ये सर्वाधिक म्हणजे 477 हिमबिबटे आढळून आले आहेत. हिंदुस्थानातील त्यांच्या संख्येच्या 70 टक्के एवढे हे प्रमाण असल्याचा अंदाज लडाखच्या केंद्रशासित प्रदेशाच्या वन्यजीव संरक्षण विभागाने व्यक्त केला आहे.
संशोधकांच्या टीमने 59 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा अभ्यास केला. त्यापैकी 47,500 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र हिमबिबटय़ांनी व्यापलेले आढळून आले. हे संशोधन ‘पीएलओएस वन’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. पँथेरा वंशातील हिमबिबटय़ा अधिवास हिंदुस्थान, चीन, नेपाळ, पाकिस्तान यासारख्या आशियाई देशांच्या पर्वतीय प्रदेशांमध्ये आहे.
हिमबिबटे पाहण्यासाठी वन्यजीवप्रेमी दूरवरून लडाखला येतात. हिमबिबटय़ा पर्यटनाचे महत्त्व स्थानिकांना समजू लागले आहे. परिणामी हिमबिबटय़ांच्या संरक्षण संवर्धनला यश येत आहे. यामुळे लडाखमध्ये हिमबिबटय़ांची संख्या वाढली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List