गेल्या 4 महिन्यात 1 हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली माहिती

गेल्या 4 महिन्यात 1 हजार शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली माहिती

जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 54 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. त्यामुळे या कालावधीत 1 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना एकूण 13 हजार 819 कोटी रुपये अद्याप वाटप होणे बाकी आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे, हे अन्यायकारक असून याविरोधात आवाज उचलणार असल्याचे दानवे म्हणाले.

गेल्या काही दिवसात राज्यातील विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

सोलापूर एमआयडीसीत लागलेल्या आगीत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पंढरपूर हुन रूग्णवाहिका आणावी लागली, यावरून दानवे यांनी राज्यातील एकूण एमआयडीसींच्या सुरक्षा व उपाययोजनांबाबत ताशेरे ओढले. जनतेचा विरोध असताना ही विविध विकासकामांच्या नावाखाली सामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठया प्रमाणात सुरू असून गुत्तेदारांच साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या राजशिष्टाचारात निष्काळजीपणा केला व त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर सरकारने पत्रक काढलं. या चुकीवर पांघरूण घालून चालणार नाही,चुकीला माफी नाही असे म्हणत विरोधी पक्ष म्हणून आम्ही याविरोधात भूमिका घेऊ असे दानवे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खरीप हंगामाच्या बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल; काही अधिकाऱ्यांच्या डुलक्या, अजित पवारांनी सर्वांना झापले खरीप हंगामाच्या बैठकीत कृषी खात्याचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल; काही अधिकाऱ्यांच्या डुलक्या, अजित पवारांनी सर्वांना झापले
राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या उपस्थितीतच कृषी विभागाचे अधिकारी मोबाईलमध्ये मश्गूल होते, तर काही अधिकारी चक्क...
जेईईचा सॅम्पल रिझल्ट दिला जात नाही, एनटीएचा खुलासा
100 वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्याची नोटीस, भाजपचे हिंदुत्व पहा कसे बेगडी; आदित्य ठाकरे यांचा ठिय्या
ई-चलानविरोधातील तब्बल 59 टक्के तक्रारी फेटाळल्या, मुंबई वाहतूक पोलिसांकडे 14 महिन्यांत 1.81 लाख तक्रारी; आरटीआयमधून माहिती उघडकीस
नाशिकच्या भाताचा गुजरातमध्ये काळाबाजार, पुरवठा खात्याचा घोटाळा उघड; राईस मिल मालकावर गुन्हा
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 22 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन