IMD Weather Update : महाराष्ट्राच्या दिशेनं येतय मोठं संकट; उरले फक्त काही तास, 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे, तसेच अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्याचं समोर आलं आहे. मुंबईसह, मराठवाडा, विदर्भ अशा सर्वच ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे. त्यातच आता चिंता वाढणारी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान शास्त्रज्ञ जालिंदर साबळे यांनी माहिती दिली आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून प्री-मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या हा पाऊस वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह होत आहे. वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. काही भागांमध्ये हा पाऊस जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांमध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, अशी माहिती जालिंदर साबळे यांनी दिली आहे.
जालन्याला अवकाळी पावसानं झोडपलं
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे फळ पिकांसह इत पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी संकटात सापडले आहेत. पीर पिंपळगाव, सिंधी पिंपळगाव, तुपेवाडी, बावणे पांगरी यासह आसपासच्या गावांमध्ये काल सायंकाळी आणि मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाल्याचं पहायला मिळालं.
विदर्भातही पावसाचा तडाखा
दरम्यान विदर्भातही पाऊस सुरूच आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसानं हजेरी लावली अहेरी भामरागड एटापल्ली व सिरोंचामध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List