छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाला मोठे यश
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाने 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. यात नक्षलवाद्यांचे बडे नेतेही मारले गेले आहेत.
या चकमकीत एका सुरक्षाकर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून एक जवानही जखमी झाला आहे. या चकमकीत 30 नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यात नंबाला केशन उर्फ बसन राज याचाही समावेश आहे. बसव राजवर एक कोटी रुपायांचे बक्षीस होते. ज्या नक्षलवाद्याला शोधण्यासाठी सुरक्षा दलाला जंग जंग पछाडले होते त्या नक्षलवाद्याला सुरक्षा दलाला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेवढे नक्षलवादी या चकमकीत मारले गेले आहेत त्यांच्यावर एकूण 1.72 कोटी रुपयांचे बक्षीस होते. या वेळी सुरक्षा दलाला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केला आहे.
या अभियानात सुरक्षा दलाला 450 आयईडी, डेटोनेटकर, स्फोटकं सापडली आहेत. सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांचे हत्यार बनवण्याचे चार कारखानेही नष्ट केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List